शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रिटेल क्षेत्रात मक्तेदारी, हजारो कोटींची उलाढाल, तरीही बिग बझार अशी झाली कर्जबाजारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 8:01 AM

1 / 10
रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या बिग बझारवर रिलायन्स इंडस्ट्री कंपनीने कब्जा केला आहे. त्यामुळे रिटेल क्षेत्रातील बिग बझारची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. हा व्यवहार लवकरच पूर्ण होणार असून, सुमारे २४ हजार ७१३ कोटी रुपयांना हा व्यवहार झाला आहे. मा्त्र रिटेल क्षेत्रातील मक्तेदारी आणि हजारो कोटींची उलाढाल असलेली कंपनी कर्जबाजारी कशी झाली याची चर्चा सध्या रंगली आहे. त्याचा घेतलेला हा आढावा.
2 / 10
बिग बझार सेलची वाट जवळपास प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातून पाहिली जाते. कारण या सेलमध्ये जवळपार प्रत्येक वस्तूवर मोठ्या प्रमाणात सवलत मिळत असते. मात्र आता रिटेल किंग म्हणून ओळख असलेल्या किशोर बियाणी यांनी आपला कारभार मुकेश अंबानी यांच्याकडे हस्तांतरीत केला आहे.
3 / 10
देशातील यशस्वी उद्योजकांमध्ये किशोर बियाणी यांचे नाव घेतले जाते. २०१९ पर्यंत त्यांच्या कारभाराचा वेगाने विस्तार होत होता. मात्र या वर्षाच्या सुरुवातीला किशोर बियाणी यांचा फ्युचर ग्रुप आर्थिक संकटात सापडला. फ्युचर ग्रुप रिटेल कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरला. त्यानंतर बँकांनी कंपनीने गहाण ठेवलेले शेअर जप्त केले.
4 / 10
२०१९ मध्ये फोर्ब्सच्या धना्ढ्य उद्योजकांच्या यादीत किशोर बियाणी हे ८० व्या क्रमांकावर होते. मात्र आता त्यांनी आपल्यावरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी आपला मोठ्या प्रमाणावरील कारभार रिलायन्स रिटेल अँड फॅशन लाइफस्टाइल लिमिटेडला २४ हजार ७१३ कोटी रुपयांना विकला. या व्यवहारासोबतच किशोर बियाणी यांच्यासमोरील रिटेल किंग ही पदवीही जाणार आहे.
5 / 10
साड्यांच्या व्यवसायापासून बिग बझारपर्यंत पोहोचलेले मारवाडी कुटुंबात जन्मलेले किशोर बियाणी यांनी १९८७ मध्ये पँटालूनची सुरुवात केली होती. पैशांच्या चणचणीमुळे त्यांनी हा व्यवसाय २०१२ मध्ये आदित्य बिर्ला समुहाला विकला. बियाणी यांनी पँटालून आणि बिग बझारची सुरुवात कोलकाता येथून केली होती.
6 / 10
सुरुवातीला त्यांच्या कंपनीचे नाव मेंन्स विअर होते. पुढे या कंपनीचे नामकरण पँटालून करण्यात आले. १९९१ मध्ये कंपनीचे नामकरण पँटालून फॅशन लिमिटेड करण्यात आले. २००१ मध्ये किशोर बियाणी यांनी संपूर्ण देशात बिग बझारचे स्टोअर उघडले.
7 / 10
किशोर बियाणी हे मुंबईतील के. एच. आर. कॉलेजचे विद्यार्थी राहिले आहेत. त्यांच्या या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात १९८० मध्ये स्टोन वॉश डेनिम फॅब्रिकपासून झाली. प्रत्येकापर्यंत स्वत:च्या लेबलमधील प्रॉडक्ट पोहोचवणे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले.
8 / 10
किशोर बियाणी हे मुंबईतील के. एच. आर. कॉलेजचे विद्यार्थी राहिले आहेत. त्यांच्या या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात १९८० मध्ये स्टोन वॉश डेनिम फॅब्रिकपासून झाली. प्रत्येकापर्यंत स्वत:च्या लेबलमधील प्रॉडक्ट पोहोचवणे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले.
9 / 10
दरम्यान, या व्यवहारानंतर रिलायन्स रिटेलच्या संचालक ईशा अंबानी यांनी सांगितले की, आम्ही छोट्या व्यापाऱ्यांसोबत सक्रिय सहभागाने आमच्या एका वेगळ्या मॉडेलसह रिटेल इंडस्ट्रीच्या विकासाला गती देण्याची अपेक्षा करत आहोत. आम्ही देशभरात आपल्या ग्राहकांना महत्त्व मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहोत. त्याद्वारे रिलायन्स फ्युचर ग्रुपच्या बिग बझार, ईजीडे आणि एफबीबीच्या १८०० हून अधिक स्टोअर्सपर्यंत पोहोचेल. हे स्टोअर्स देशातील ४२० प्रमुख शहरांमध्ये पोहोचले आहेत.
10 / 10
रिलायन्स आणि फ्युचर रिटेलमधील या व्यवहाराची सुरुवात याच वर्षी झाली होती. रिलायन्सच्या आधी अमेरिकन कंपनी अॅमेझॉननेसुद्धा फ्युचर ग्रुपमध्ये स्वारस्य दाखवले होते. मात्र आरआयएलसोबतच्या एका डिलने बियानी यांच्या कर्जाच्या प्रश्नाला पूर्णपणे सोडवले आहे. आता या व्यवहारानंतर किशोर बियाणी यांना आपल्यावरील सर्व कर्ज फेडून कर्जमुक्त होण्याची संधी मिळेल. त्यानंतर त्यांच्याकडे नव्याने सुरुवात करण्याची संधी असेल.
टॅग्स :Big Bazaarबिग बाजारRelianceरिलायन्सbusinessव्यवसाय