शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

किती ही कमाई! Elon Musk यांचाच डंका; जगातील पहिले ट्रिलिनियर होणार, मॉर्गन स्टॅनलींचे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 2:03 PM

1 / 10
टेस्ला (Tesla) आणि स्पेस एक्सचे (SpaceX) प्रमुख एलन मस्क (Elon Musk) यांच्या संपत्तीत रॉकेटप्रमाणे वाढ होत असून, यंदाच्या वर्षात एलन मस्क यांची संपत्ती तब्बल ७२ अब्ज डॉलरची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
2 / 10
जगभरात सेमी कंडक्टर तसेच मायक्रोचिपची कमतरता असूनही इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे उत्पन्न आणि नफा तिसऱ्या तिमाहीत नव्या विक्रमांवर पोहोचला आहे. कंपनीचा शेअरही सातत्याने वाढत आहे. यावर्षी कंपनीचा शेअर १८ टक्क्यांनी वाढला आहे.
3 / 10
ज्याप्रकारे मस्क यांची संपत्ती वाढत आहे, ते पाहता ते जगातील पहिले ट्रिलिनियर व्यक्ती बनू शकतात. म्हणजेच त्यांची नेटवर्थ येत्या काही दिवसात १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते, असे सांगितले जात आहे.
4 / 10
टेस्लाच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांनुसार, कंपनीचे निव्वळ उत्पन्न १.६२ अब्ज डॉलर होते. कंपनीचे उत्पन्न १ अब्ज डॉलर्स ओलांडण्याची ही दुसरी वेळ आहे. मागील तिमाहीत कंपनीचे निव्वळ उत्पन्न ३३१ दशलक्ष डॉलर होते. हेच कारण आहे की, मस्क जगातील पहिले ट्रिलिनियर बनण्याची शक्यता वाढली आहे, असे म्हटले जात आहे.
5 / 10
टेस्लाची तीन तिमाहींची कमाई ५७ टक्क्यांनी वाढून १३.८ अब्ज डॉलर झाली, तर नफा ७७ टक्क्यांनी वाढून ३.७ अब्ज डॉलर्स झाला आहे. कंपनीने या महिन्यात जाहीर केले की, त्यांनी पहिल्या तिमाहीत २,३७,८२३ वाहने तयार केली आणि २,४१,३०० वाहनांची विक्री केली. ऑटोमोटिव्ह विभागाच्या एकूण मार्जिनमध्ये सुधारणा झाल्याने कंपनीचा नफा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.
6 / 10
कंपनीच्या अहवालानुसार, चिपची कमतरता आणि बंदरांवर गर्दीमुळे टेस्लाचे कारखाने पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, त्यांच्या प्रॉडक्शन टीमने या अडचणींवर मात करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.
7 / 10
Elon Musk यांची एकूण संपत्ती २४२ अब्ज डॉलर झाली आहे आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस खूप मागे आहेत. मस्कची एकूण संपत्ती बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांच्या एकत्रित निव्वळ संपत्तीपेक्षा जास्त आहे.
8 / 10
सुमारे १३३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह गेट्स श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत, तर बफेट १०५ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह १० व्या क्रमांकावर आहेत. ब्लूमबर्गच्या बिलियनेअर इंडेक्सनुसार, स्पेसएक्स मस्कच्या यांच्या निव्वळ संपत्तीमधील १७ टक्के वाटा एकट्या स्पेसएक्सचा आहे.
9 / 10
येत्या काही दिवसांत त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. स्पेसएक्स अंतराळ प्रवासाच्या क्षेत्रात खूप वेगाने काम करत आहे. अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या रॉकेट आणि उपग्रह तयार करण्यात, सखोल अंतराळ संशोधनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम करत आहेत. तसेच सॅटेलाईट कम्युनिकेशन कंपनी स्टारलिंकमध्येही मोठी उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
10 / 10
दरम्यान, एलन मस्क (Elon Musk) यांनी गुगल (Google) आणि फेसबुकसारख्या (Facebook) बड्या टेक कंपन्यांवर जोरदार टीका केली आहे. एका ट्विटला उत्तर देताना, गुगल, फेसबुकसारख्या मोठ्या टेक कंपन्या अशा ठिकाणांमध्ये बदलल्या आहेत जिथे तरुणांची प्रतिभा मरते, या शब्दांत एलन मस्क यांनी निशाणा साधला आहे.
टॅग्स :Teslaटेस्लाbusinessव्यवसाय