शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोठी उलथा पालथ! श्रीमंतांच्या यादीतून अदानी-अंबानी बाहेर, पाहा अपडेटेड यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 8:33 AM

1 / 9
जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत चुरशीची स्पर्धा सुरू आहे. एकीकडे इलॉन मस्क, बर्नार्ड अर्नॉल्टशी पहिल्या क्रमांकाची खुर्ची पुन्हा विराजमान करण्यासाठी स्पर्धा करत असताना, दुसरीकडे अॅमेझॉनचे जेफ बेझोस मस्कला मागे टाकण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
2 / 9
टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीमध्ये दीर्घकाळ आपला दबदबा कायम ठेवल्यानंतर, भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी बऱ्याच काळापासून टॉप-10 यादीतून बाहेर राहिले आहेत.
3 / 9
रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी श्रीमंतीच्या यादीतून म्हणजेच टॉप-10 मध्ये गेल्या काही महिन्यापासून आपला झेंडा फडकावत होते. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून तेही या यादीतून बाहेर पडलेले दिसत आहेत.
4 / 9
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अंबानींची एकूण संपत्ती ८४.७ बिलियन डॉलर आहे आणि एवढ्या संपत्तीसह ते अब्जाधीशांच्या यादीत १३ व्या क्रमांकावर आहेत. गौतम अदानी ५४.३ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील २३ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
5 / 9
२०२३ च्या सुरुवातीपासून श्रीमंतांच्या यादीतून उद्योगपती गौतम अदानी या बाबतीत खालच्या स्थानावर आहेत. अदानी या वर्षात ६५.५ अब्ज डॉलर संपत्ती गमावली आहे, तर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत आतापर्यंत १.२९ अब्ज डॉलरची घट झाली आहे.
6 / 9
गेल्या काही दिवसांपासून मुकेश अंबानी आणि फेसबुक (मेटा) चे मार्क झुकरबर्ग यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. ८७.४ अब्ज डॉलरसह झुकेरबर्ग या यादीत १२व्या स्थानावर आहे. अंबानी-झकरबर्गच्या संपत्तीमध्ये १.६ बिलियन डॉलरचे अंतर आहे.
7 / 9
नंबर-1 च्या खुर्चीवर अर्नॉल्ट यांचा दबदबा फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड अर्नॉल्ट २०३ अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांची संपत्ती १६६ अब्ज डॉलर आहे ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि जेफ बेझोस १३७ अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती १२५ अब्ज डॉलर आहे, तर दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे ११४ अब्ज डॉलर संपत्ती असलेले पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
8 / 9
श्रीमंतांच्या टॉप-१० यादीतील सहाव्या क्रमांकावर लॅरी एलिसन आहे, त्यांची मालमत्ता ११० अब्ज डॉलर आहे. स्टीव्ह बाल्मर हे १०९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत, तर लॅरी पेज १०९ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह आठव्या स्थानावर आहेत. १०३ अब्ज डॉलर्ससह सेर्गे ब्रिन आणि ९४.३ अब्ज डॉलर्ससह कार्लोस स्लिम हे टॉप-१० अब्जाधीशांच्या यादीत अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.
9 / 9
गेल्या वर्षी २०२२ मध्ये, गौतम अदानी सर्वाधिक कमाईच्या बाबतीत पुढे होते. त्याचबरोबर या वर्षात सर्वाधिक संपत्ती गमावण्याच्या बाबतीत अदानी यांचे नाव आघाडीवर आहे. अदानी समुहाला हिंडेनबर्गच्या अहवालाचा तोटा झाला आहे. २४ जानेवारी २०२३ रोजी प्रकाशित झालेल्या एका संशोधन अहवालामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुनामी आली होती आणि अनेक शेअर्स दोन महिन्यांत ८५ टक्क्यांपर्यंत घसरले होते. त्यामुळे अदानी समूहाचे बाजार भांडवलही १०० अब्ज डॉलरच्या खाली पोहोचले होते. हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत ८८ प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यात शेअरच्या किमतीत फेरफार करण्यापासून ते कर्जापर्यंतच्या आरोपांचा समावेश होता.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीGautam Adaniगौतम अदानी