Mukesh Ambani Buys Most Expensive Private Jet, Worth 1000 Crore Rupees
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल... By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 8:39 PM1 / 7 Mukesh Ambani New Private Jet : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) दररोज कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे चर्चेत असतात. यावर्षी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नामुळे संपूर्ण अंबानी कुटुंब खूप चर्चेत राहिले. 2 / 7 आता मुकेश अंबानी यांची पुन्हा एकदा वेगळ्या कारणामुळे चर्चा सुरू झाली आहे. आता चर्चेत येण्याचे कारण अंबानी कुटुंबाचे नवीन खाजगी जेट बोइंग 737 मॅक्स 9 आहे. हे भारतातील पहिले अल्ट्रा लक्झरी खाजगी जेट असून, याची किंमत ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल. 3 / 7 तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, अंबानी कुटुंबाच्या नवीन लक्झरी प्रायव्हेट जेट बोइंग 737 मॅक्स 9 ची किंमत सुमारे 1000 कोटी रुपये आहे. आतापर्यंत भारतात कोणाकडेही हे विमान नाही. भारतात या विमानाची खूप दिवसांपासून चर्चा सुरू होती. 4 / 7 अखेर हे महागडे खासगी जेट ऑगस्टमध्ये भारतीय भूमीवर दाखल झाले. भारतात आणण्यापूर्वी त्याची बासेल, जिनिव्हा आणि लंडनमध्ये चाचणी करण्यात आली. अंबानी कुटुंबाने त्यांच्या गरजेनुसार त्यात बरेच कस्टमायझेशन केले आहे.5 / 7 जगातील कोणत्याही उद्योगपतीकडे बोईंग 737 मॅक्स 9 नाही. म्हणजेच, हे विमान मिळवणारे मुकेश अंबानी जगातील पहिले उद्योगपती आहेत. हे विमान त्याच्या प्रशस्त केबिन आणि मोठ्या मालवाहू जागेसाठी ओळखले जाते.6 / 7 या विमानात दोन CFMI LEAP-1B इंजिन मिळते. MSN 8401 क्रमांक असलेले हे लक्झरी प्रायव्हेट जेट एकावेळी 11,770 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. आराम, वेग आणि लक्झरी यांचा कॉम्बो असलेल्या Boeing 737 Max 9 ला आकाशात उडणारे 7 स्टार हॉटेल म्हणतात.7 / 7 महत्वाची बाब म्हणजे, अंबानी कुटुंबाकडे बोईंग 737 MAX 9 व्यतिरिक्त स्वतःच्या मालकीचे आणखी 9 लक्झरी खाजगी जेट आहेत. यामध्ये Bombardier Global 6000 आणि Embraer ERJ-135 तसेच दोन Dassault Falcon 900 यांचा समावेश आहे. 9 लाख कोटींहून अधिक मालमत्तेचे मालक मुकेश अंबानी यांच्याकडे एकापेक्षा एक आलिशान कारदेखील आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications