mukesh ambani made 303 billion dollar in one day joins top 10 club again
Mukesh Ambani Return : एका दिवसात इतके कमावले की, मुकेश अंबानी पुन्हा टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत आले By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 3:15 PM1 / 12रिलायन्स इंडस्ट्रीचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी (Mukesh Ambani) पुन्हा एकदा जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत आपलं स्थान पटकावलं आहे. मुकेश अंबानींनी एका दिवसात तब्बल 21,949 कोटींची कमाई केली आहे. 2 / 12रिलायन्सच्या शेअर्समध्ये शुक्रवारी वाढ झाल्याने अंबानी यांना 3.03 अब्ज डॉलर (जवळपास 2,19,49,94,11,500 रुपये) फायदा झाला आहे. Bloomberg Billionaires Index ने दिलेल्या माहितीनुसार 81 अब्ज डॉलर संपत्तीसह अंबानी जगातील टॉप अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत. 3 / 12शुक्रवारी रिलायन्स शेअर बीएसईवर 3.60 टक्क्यांच्या उसळीसह 2081.90 वर बंद झाला. यासोबतच रिलायन्स मार्केट कॅप 1,341,805.09 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. रिलायन्सचे शेअर याआधी 2369 रुपयांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहाचला होता. 4 / 12रिलायन्सचा शेअर 16 सप्टेंबर 2020 मध्ये 2369 रुपयांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचला होता. यावेळी रिलायन्स सातव्या आसमानवर होती. रिलायन्सचे बाजारमुल्य़ 16 लाख कोटींवर पोहोचले होते.5 / 12यामुळे अंबानींची संपत्तीही 90 अब्ज डॉलरवर गेल्याने ते जगातील अब्जाधीशांच्या यादीत चौथ्या स्थानावर आले होते. मात्र, यानंतर रिलायन्सच्या शेअरमध्ये झपाट्याने घसरण झाली आणि त्याचा फटका अंबानींनाही बसला आहे.6 / 12मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या संपत्तीमध्ये या वर्षात 5.43 अब्ज डॉलरची वाढ झाली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अंबानी हे 82.1 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील अब्जाधीशांच्या यादीच 11 स्थानावर आले होते. 7 / 12अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) हे या यादीमध्ये 25 व्या स्थानावर आले आहेत. यांना यंदाचे कोरोनाचे वर्ष चांगलेच फळले आहे. त्यांच्या संपत्तीत 16.4 अब्ज डॉलरची वाढ झाली. यामुळे त्यांची संपत्ती 50.1 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.8 / 12अॅमेझॉनचे जेफ बेजोस यांची संपत्ती 181 अब्ज डॉलर एवढी असून त्यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.9 / 12Bloomberg Billionaires Index नुसार सर्वाधिक चर्चेत असलेली ऑटो कंपनी टेस्लाचे आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) हे दुसऱ्या स्थानावर आले आहेत. मस्क यांची संपत्ती 170 अब्ज डॉलर एवढी झाली आहे. 10 / 12मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे 138 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.11 / 12जगातील सर्वात मोठी लक्झरी गुड्स कंपनी LVMH Moët Hennessy चे अध्यक्ष बर्नार्ड आरनॉल्ट हे 125 अब्ज डॉलर संपत्तीसह चौथ्या क्रमांकावर आहेत.12 / 12फेसबुकचा मार्क झुकेरबर्ग 110 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर आहे. तर वॉरेन बफेट (Warren Buffett) 95.9 अब्ज डॉलर संपत्तीसह सहाव्या क्रमांकावर आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications