शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mukesh Ambani:मुकेश अंबानी यांनी न्यूयॉर्कमध्ये खरेदी केले 728 कोटी रुपयांचे आलिशान हॉटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 3:05 PM

1 / 8
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी एका वर्षाच्या आत आणखी एक हॉटेल खरेदी केले आहे.
2 / 8
मुकेश अंबानींनी यापूर्वी लंडनचा कंट्री क्लब आणि गोल्फ रिसॉर्ट स्टोक पार्क विकत घेतला होता. तर आता त्यांनी न्यूयॉर्कचे लक्झरी मँडरीन ओरिएंटल हॉटेल खरेदी केले आहे.
3 / 8
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड(Reliance Industries Limited) ने 728 कोटी($9.81 कोटी) मध्ये न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल 'मँडेरीन ओरिएंटल'ची खरेदी केली आहे.
4 / 8
2003 मध्ये बांधलेले मँडरीन ओरिएंटल हे 80 कोलंबस, न्यूयॉर्क सर्कल येथे स्थित एक प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल आहे. सेंट्रल पार्क आणि कोलंबस सर्कलच्या अगदी शेजारी हे हॉटेल आहे.
5 / 8
रिलायन्सने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत केलेली ही हॉटेलची दुसरी खरेदी आहे. गेल्या वर्षीच मुकेश अंबानी यांनी ब्रिटनचे पहिला आयकॉनिक कंट्री क्लब आणि गोल्फ रिसॉर्ट स्टोक पार्कला £57 मिलियन पाउंड म्हणजेच 592 कोटी रुपयांत खरेदी केले होते.
6 / 8
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या मालकीची उपकंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेड (RIIHL) ने आज कोलंबस सेंटर कॉर्पोरेशनचे संपूर्ण जारी केलेले शेअर्स अंदाजे $9.81 कोटी इक्विटी रिटर्नवर जारी केले आहेत, असे कंपनीने सांगितले आहे.
7 / 8
ही कंपनी केमॅन आयलंड्समध्ये असून, कंपनीचे मँडरीन ओरिएंटलमध्ये अप्रत्यक्षपणे 73.37 टक्के शेअर्स आहेत. मँडरीन ओरिएंटल हे न्यूयॉर्क शहरातील प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल्सपैकी एक आहे.
8 / 8
मुंबईत कन्व्हेन्शन सेंटर्स, हॉटेल्स आणि व्यवस्थापित निवास व्यवस्था विकसित करण्याव्यतिरिक्त रिलायन्सची सध्या EIH Ltd मध्ये गुंतवणूक आहे.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीhotelहॉटेलbusinessव्यवसाय