Mukesh Ambani reliance buys Britains iconic country club Stoke Park for 57 million pounds
मुकेश अंबानींनी ५९२ कोटींना खरेदी केलं ब्रिटनमधील आयकॉनिक स्टोक पार्क; पाहा काय आहे विशेष By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 5:56 PM1 / 15दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं ५७ दशलक्ष पौंड्स म्हणजेच जवळपास ५९२ कोटी रूपयांना ब्रिटनच्या आयकॉनिक कंट्री क्लब आणि लक्झरी गोल्फ रिसॉर्ट पार्कची खरेदी केली. 2 / 15गेल्या चार वर्षांमध्ये कंपनीनं केलेल्या ३३० कोटी रूपयांच्या अधिग्रहणाची माहिती कंपनीकडून देण्यात आली. 3 / 15यामध्ये रिटेल सेक्टरमध्ये १४ टक्के, तंत्रज्ञान तसंच मीडिया आणि टेलिकॉम क्षेत्रात ८० टक्के आणि ऊर्जा क्षेत्रात ६ टक्के अधिग्रहणाचा समावेश आहे. 4 / 15रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची संपूर्ण मालकीची कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रियल इनव्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्ज लिमिटेडनं (आरआयआयएचएल) हे अधिग्रहण केलं. 5 / 15२२ एप्रिल रोजी कंपनीनं युनायटेड किंगडम येथील स्टोक पार्क लिमिटेडचं ५७ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ५९२ कोटी रूपयांना अधिग्रहण केल्याची माहिती कंपनीनं दिली. 6 / 15स्टोक पार्क लिमिटेड बर्किंघमशायरच्या स्टोक पार्क पोझेझमध्ये स्पोर्टिंग आणि लिझर फॅसिलिटी ओन आणि मॅनज करतं. 7 / 15स्टोक पार्कमध्ये लक्झरी स्पा, हॉटेल, गोल्फ कोर्स आणि कंट्री क्लब आहेत. स्टोक पार्क एकूण ३०० एकर जागेत पसरलेलं आहे. 8 / 15सुविधांमध्ये एक हॉटेल, कॉन्फरन्स सनविधा, खेळाच्या सुविधा आणि युरोपमध्ये हाय रेटेड गोल्फ कोर्सचा समावेश आहे.9 / 15रिलायन्स इंडस्ट्रीजचे म्हणणे आहे की आता आरआयआयएचएलने या हेरिटेज साइटवर खेळ व विश्रांतीसाठीच्या सुविधांमध्ये आणखी वाढ करण्याची योजना आखली आहे, जे स्थानिक नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णपणे पालन करुन केलं जाईल.10 / 15हे अधिग्रहण रिलायन्सला कंझ्युमर आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रांमध्ये आपले पाय रोवण्यासाठी मदत करेल.11 / 15पाइनवुड स्टुडिओ आणि ब्रिटिश चित्रपटसृष्टीत स्टोक पार्कचा नेहमीच जवळचा संबंध आहे.12 / 15जेम्स बाँडचे दोन चित्रपट गोल्डफिंगर आणि टुमारो नेव्हर डाईज या चित्रपटांचं चित्रिकरण स्टोक पार्कमध्येच करण्यात आलं आहे. 13 / 15पार्कनं आपल्या वेबसाईटवर नमूद केलं की जेम्स बाँड (शॉन कॉनरी) आणि गोल्ड फिंगर (गर्ट फ्रोब) यांच्यातील एपिक ड्युअल आताही चित्रपटांच्या इतिहासात गोल्फचा सर्वात प्रसिद्ध खेळ मानला जातो.14 / 15३०० एकर परिसरात पसरलेल्या पार्कलँडमध्ये Bridget Jones's Diary च्या काही दृश्यांचं चित्रिकरणही या ठिकाणी झालं होतं. 15 / 15ब्रिटनची किंग फॅमिली अनेक वर्षांपासून याच्या विक्रीचा प्रयत्न करत होती. त्यांनी २०१८ मध्ये याच्या विक्रीची शक्यता पडताळण्यासाठी CBRE जारी केला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications