शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Russia-Ukraine Crisis: रशिया-युक्रेन संघर्षाचा अंबानी-अदानींना झटका! ८८ हजार कोटी बुडाले; मार्केट कॅपही कोसळले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 2:01 PM

1 / 9
आताच्या घडीला संपूर्ण जगाचे लक्ष रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाकडे (Russia-Ukraine Conflict) लागले आहे. हा संघर्ष लवकरात लवकर शमावा, यासाठी अन्य देशांकडून प्रयत्न केले जात आहे. अमेरिकेने रशियावर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.
2 / 9
यावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातील बाजारपेठांना मोठा झटका बसला आहे. भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे १३.२३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
3 / 9
यासह रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी आणि अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदानी यांनाही या संघर्षाचा मोठा फटका बसला आहे. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी या देशातील दोन बड्या श्रीमंतांना एकूण ८८ हजार कोटी रुपयांचा झटका बसला आहे.
4 / 9
एका रिपोर्टनुसार, आशिया आणि भारतातील सर्वांत मोठे श्रीमंत मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ५.२५ अब्ज डॉलरची घट झाली. आता त्यांची एकूण संपत्ती ८४.६ अब्ज डॉलर आहे. जरी तो अजूनही जगातील अब्जाधीशांच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहे. या वर्षात त्यांची एकूण संपत्ती ५.३४ अब्जने घसरली आहे.
5 / 9
दुसरीकडे, अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत ६.४३ अब्ज डॉलरची घट झाली. भारतातील आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत गौतम अदानी यांची एकूण संपत्ती आता ८०.६ अब्ज डॉलर इतकी आहे. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती ४.०९ अब्ज डॉलरने वाढली आहे. ते जगातील श्रीमंतांच्या यादीत अंबानींच्या एका स्थानाने खाली ११व्या क्रमांकावर आहे.
6 / 9
याशिवाय, गेल्या सात सत्रांच्या सलग घसरणीमुळे रिलायन्स इंडस्ट्रिजचे मार्केट कॅपमध्ये १.१ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. त्याच वेळी, गेल्या ७ सत्रांमध्ये अदानी समूहाच्या समभागांच्या मार्केट कॅपमध्ये ६६ हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.
7 / 9
तसेच कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. २०१४ नंतर प्रथमच ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल १०५ डॉलरच्या वर पोहोचली आहे. ब्रेंट क्रूड ८.५ टक्क्यांनी वाढून १०५.०८ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक ऊर्जा पुरवठ्याशी संबंधित चिंता वाढली आहे.
8 / 9
फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांचे २८ लाख कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. मुंबई शेअर मार्केटमध्ये बाजार भांडवल २ फेब्रुवारी रोजी २,७०,६४,९०५.७५ कोटी रुपये होते, जे आता २,४२,३१,३७९.२० कोटी रुपये आहे. अशा प्रकारे फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांचे २८.३३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
9 / 9
शेअर मार्केटमध्ये टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, यूपीएल, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि अदानी पोर्ट्सला निफ्टीचा सर्वाधिक फटका बसला. BSE मिड आणि स्मॉलकॅप निर्देशांक ५ टक्क्यांनी घसरला आहे.
टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाshare marketशेअर बाजारMukesh Ambaniमुकेश अंबानीAdaniअदानीRelianceरिलायन्स