शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mukesh Ambani Reliance: मुकेश अंबानींचा भीमपराक्रम! रिलायन्सची ऐतिहासिक कामगिरी; केला नवा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 6:32 PM

1 / 9
गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे शेअर बाजारात घसरण होत असताना दुसरीकडे मात्र मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने भीमपराक्रम करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारी रिलायन्स पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. (Mukesh Ambani Reliance Industries)
2 / 9
खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स कंपनीने इतिहास रचला आहे. रिलायन्स कंपनीचे बाजार मूल्य १९ लाख कोटी रुपयांहून अधिक झाले. शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर २० रुपयांच्या घसरणीसह उघडला. मात्र, त्यानंतर शेअर बाजारात खरेदीचा जोर वाढला.
3 / 9
रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर सकाळच्या सत्रात २८२७.१० रुपयांच्या सार्वकालीन उच्चांकी पातळीवर गेला. त्यात १.५ टक्के वाढ झाली. या तेजीने रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल १९ लाख कोटींवर गेले आहे.
4 / 9
रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर मागील सात सत्रात ११ टक्क्यांनी वधरला आहे. एप्रिल महिन्यात रिलायन्सच्या शेअरमध्ये ८ टक्के वाढ झाली आहे. चालू वर्षात हा शेअर १९ टक्क्यांनी वधारला असून गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.
5 / 9
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमधील तेजीमागे अनेक कारणे आहेत. त्यात मुख्य कारण म्हणजे सिंगापूरमधील ग्रॉस रिफायनरी मार्जिनमध्ये झालेली वाढ आहे. रशिया-युक्रेन युद्धाने युरोपीय बाजारात इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
6 / 9
आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनांचा फायदा रिलायन्सला होण्याची शक्याता जाणकारांनी व्यक्त केली आहे. मॉर्गन स्टॅन्ले या ब्रोकर संस्थेने दिर्घ कालावधीसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे टार्गेट ३९७५ रुपये इतके ठेवले आहे.
7 / 9
मार्च महिन्यापासून आतापर्यंत रिलायन्सचा शेअर २५ टक्क्यांनी वधारला आहे. मागील महिनाभरापासून गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील शेअरने भांडवली बाजारात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे मुकेश अंबांनी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने तेजीची वाट धरली आहे.
8 / 9
बुधवारी सेन्सेक्समध्ये ५४० अंकांची घसरण झाली असून निफ्टीत १७५ अंकांची घसरण झाली आहे. मात्र, तरीही रिलायन्सने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
9 / 9
दुसरीकडे, ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म Jefferies ने रिलायन्सच्या शेअरची किंमत ३४०० रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. वर्ष २०२१ मध्ये रिलायन्सच्या शेअरने निफ्टीच्या तुलनेत कमी कामगिरी केली आहे. रिटेल आणि टेलिकॉम व्यवसायामुळे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या व्यवसायात ३६ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीRelianceरिलायन्सshare marketशेअर बाजार