शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Relianceचा मेगा प्लान! मुकेश अंबानींनी बॅटरी बनवणारी ‘ही’ कंपनी केली खरेदी; ६ कोटी डॉलर गुंतवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 9:43 AM

1 / 9
गेल्या काही महिन्यांपासून मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रीन एनर्जी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात भर देत असून, अब्जावधी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात केली जात आहे. भविष्यातील ग्रीन एनर्जी सेक्टरच्या उज्ज्वल भविष्याचा अंदाज घेऊन मुकेश अंबानींनी मेगा प्लान आखल्याचे सांगितले जात आहे.
2 / 9
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने अलीकडेच लिथियम आयन बॅटरी बनवणारी कंपनी लिथियम वर्क्सचे (Lithium Werks) अधिग्रहण केले आहे. रिलायन्सने हा करार ६ कोटी १० लाख डॉलरमध्ये केला आहे.
3 / 9
रिलायन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, लिथियम वर्क्स इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरली जाणारी लिथियम-आयन फॉस्फेट बॅटरी बनवते. रिलायन्स इंडस्ट्रीजने रिलायन्स न्यू एनर्जीच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांसाठी लिथियम-आयन बॅटरी बनवणाऱ्या लिथियम वर्क्समध्ये गुंतवणूक केली आहे.
4 / 9
लिथियम वर्क्सच्या नावावर २१९ पेटंट आहेत आणि कंपनीची चीनमध्ये उत्पादन सुविधा देखील आहे. रिलायन्सने या डीलमध्ये कंपनीचे सध्याचे सर्व व्यावसायिक करार समाविष्ट केले आहेत.
5 / 9
डिसेंबरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने यूकेची सोडियम आयन बॅटरी निर्माता फॅराडियन १३ कोटी डॉलरला विकत घेतली. एकामागून एक दोन इलेक्ट्रिक बॅटरी निर्माते खरेदी करून, रिलायन्सने हे स्पष्ट केले आहे की, भविष्यात कंपनी भारतात मोठ्या प्रमाणावर बॅटरी बनवण्याची क्षमता विकसित करू इच्छित आहे.
6 / 9
इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता, भारत सरकारही देशातील बॅटरी उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे. तेलापासून दूरसंचार व्यवसाय करणाऱ्या रिलायन्सने ग्रीन एनर्जीमध्ये १० अब्ज डॉलर गुंतवण्याची घोषणा केली आहे. २०३५ पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
7 / 9
इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी बनवणाऱ्या कंपन्यांना सरकार ६ अब्ज डॉलर उत्पादन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLIs) देत आहे.
8 / 9
बाजार भांडवलानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीचे बाजार भांडवल १५,९५,१४५ कोटी रुपये आहे.
9 / 9
२०२०-२१ या आर्थिक वर्षात एकत्रित उत्पन्न ५,३९,२३८ कोटी रुपये होते, तर कंपनीने या कालावधीत ५३,७३९ कोटी रुपये कमावले होते.
टॅग्स :Relianceरिलायन्सMukesh Ambaniमुकेश अंबानीelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर