शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mukesh Ambani Reliance: मुकेश अंबानींची नवीन व्यावसायात उडी; 5 वर्षात इतर सर्व कंपन्यांना टाकणार मागे...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 8:03 PM

1 / 7
Mukesh Ambani Reliance: रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) ने फॉर्च्यून 500 यादीत 51 स्थानांनी झेप घेत 104वे स्थान पटकावले आहे. भारतातील सरकारी कंपनी LICनंतर या यादीत येणारी रिलायन्स ही दुसरीच कंपनी आहे. पण आता RIL ला दुसऱ्या एका कंपनीकडून कडवे आव्हान मिळणार आहे.
2 / 7
पुढील 5-7 वर्षांत ही कंपनी आरआयएललाही मागे टाकेल, असे म्हटले जात आहे. पण हा पराक्रम करणारी कंपनी स्वतः रिलायन्स ग्रुपचीच कंपनी आहे. तुम्ही विचार करत असाल की हे आश्चर्यकारक काम जिओ किंवा रिलायन्स रिटेल करेल. पण तसे नाही, रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा दावा आहे की, येत्या 5 ते 7 वर्षांत रिलायंस ग्रीन एनर्जी ही सर्वात फायदेशीर कंपनी बनेल.
3 / 7
मुकेश अंबानींचा हा दावा विश्वास ठेवण्यासारखा आहे, कारण ते नेहमीच नवीन व्यवसाय उभारण्यात आणि कंपन्यांना पुढे नेण्यात यशस्वी ठरत आले आहेत. 2016 मध्ये जिओ लाँच करून त्यांनी टेलिकॉम क्षेत्रात मोठी खळबळ उडवली होती. अलीकडेच त्यांनी 5G स्पेक्ट्रम लिलावात सर्वाधिक बोली लावून दूरसंचार क्षेत्रात नवीन उंची गाठण्याचा बिगुल वाजवला आहे.
4 / 7
आता मुकेश अंबानी ग्रीन एनर्जी क्षेत्रात 6 लाख कोटींची गुंतवणूक करून, या उदयोन्मुख क्षेत्राचे सम्राट होण्याच्या दिशेने एक दमदार पाऊल टाकत आहेत. कंपनी पुढील 1 वर्षात हा व्यवसाय सुरू करण्याची तयारी करत आहे. कंपनीने या नवीन ऊर्जा क्षेत्रातील क्षमता विस्तारासाठी 5,500 कोटी रुपयांहून अधिक संपादन आणि गुंतवणूक पूर्ण केली आहे. पुढील तीन वर्षांत हरित ऊर्जेमध्ये 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा मुकेश यांनी गेल्या वर्षीच केली होती.
5 / 7
याअंतर्गत कंपनी 4 गिगा कारखाने उभारणार आहे, जे हरित ऊर्जेशी संबंधित सर्व उत्पादने बनवतील. या योजनेअंतर्गत कंपनीकडून ग्रीन एनर्जी व्हॅल्यू चेन, आणि संबंधित तंत्रज्ञानामध्येही गुंतवणूक केली जाईल. यासाठी इतर कंपन्यांशीही भागीदारी करणार आहे. त्यांच्या स्वत:च्या बळावर पुढील 7 वर्षांत भारताला हरित ऊर्जेसाठी सर्वात स्वस्त गंतव्यस्थान बनवण्याचा अंबानींचा मानस आहे.
6 / 7
आरआयएलचे सीएमडी मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक अहवालात म्हटले की, 'ग्रीन एनर्जी व्हॅल्यू चेनमध्ये आरआयएलची गुंतवणूक पुढील 12 महिन्यांत हळूहळू सुरू होईल आणि पुढील काही वर्षांत ती वेगाने वाढेल. हा व्यवसाय नवीन आहे, याचे ग्रोथ इंजिन केवळ 5 ते 7 वर्षांत आमच्या इतर सर्व इंजिनांना मागे टाकू शकते. पारंपारिक रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल व्यवसायाच्या पलीकडे जाऊन आपल्या व्यवसायात विविधता आणण्याच्या प्रयत्नात अंबानी रिलायन्सला स्वच्छ ऊर्जेकडे घेऊन जात आहेत.
7 / 7
रिलायन्स सौरऊर्जा निर्मितीपासून ते ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन, वितरण आणि वापरापर्यंतच्या संपूर्ण ग्रीन एनर्जी व्हॅल्यू चेनसाठी गिगा-फॅक्टरी बांधत आहे. रिलायन्स समूहाने गुजरातमधील जामनगर येथील धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी कॉम्प्लेक्समध्ये 4 गिगा कारखान्यांचे बांधकाम सुरू केले आहे. अंबानी हे कोणतेही व्यावसायिक बदल विवेकाने अंमलात आणण्यात तज्ञ मानले जातात. गेल्या दशकभरात, त्यांनी रिलायन्सला अनेक क्षेत्रात पुढे नेले आहे.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीRelianceरिलायन्स