शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mukesh Ambani Succession Plan: ईशा, आकाश, अनंत अंबानींना मिळू शकतात 'हे' व्यवसाय; मुकेश अंबानींनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 7:18 PM

1 / 7
Mukesh Ambani Succession Plan: रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) चेअरमन मुकेश अंबानी आपल्या व्यवसायाच्या विभाजन करण्याची योजना अंमलात आणताना दिसत आहेत. आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी 29 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) त्यांच्या सक्सेशन प्लॅनबद्दल स्पष्ट असल्याचे दिसून आले.
2 / 7
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आपल्या व्यवसायाचे विभाजन करण्यासाठी एक स्पष्ट रोडमॅप तयार केला आहे. यावरून आकाश, अनंत आणि ईशा अंबानी यांच्यात रिलायन्स समूहाचा व्यवसाय कसा विभागला जाईल याचे संकेत मिळत आहे. आज एजीएममध्ये त्यांनी आपल्या भाषणातही याचा उल्लेख केला आणि रिलायन्स रिटेलच्या प्रमुखपदी त्यांची मुलगी ईशा अंबानी यांचे नाव दिले.
3 / 7
सक्सेशन प्लॅनवर बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, “आमच्या पुढच्या पिढीतील आत्मविश्वासाने व्यवसायाचे नेतृत्व करत आहेत. आकाश आणि ईशा यांनी अनुक्रमे जिओ आणि रिटेलची चांगली काळजी घेतली आहे. त्याच वेळी अनंत आमच्या न्यू एनर्जी व्यवसायात रस दाखवत आहे आणि तो या व्यवसायात खूप सक्रिय आहे.”
4 / 7
मुकेश अंबानी यांनी सोमवारी आपली मुलगी ईशा अंबानी हिला रिटेल व्यवसाय आणि मुलगा अनंत अंबानी याला एनर्जी व्यवसाय सोपवण्याची घोषणा करून देशातील सर्वात मोठ्या कंपनीची उत्तराधिकार योजना स्पष्ट केली. आकाश अंबानी यांच्या कडे दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओची धुरा त्यांनी यापूर्वीच सोपवली आहे.
5 / 7
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) अंबानी यांनी ईशा आणि अनंत अंबानी यांना नवीन जबाबदारी सोपवण्याची घोषणा केली. ईशा अंबानी रिलायन्स रिटेलच्या लीडर म्हणून काम करतील तर अनंत अंबानी हे ऊर्जा व्यवसाय हाताळेल. उत्तराधिकार्‍यांची नावे ठरवताना अंबानी यांनी मात्र आपण सध्या निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट केले. पूर्वीप्रमाणेच सक्रिय नेतृत्व दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
6 / 7
रिलायन्स समुहाच्या व्यवसायांपैकी रिटेल आणि डिजिटल व्यवसाय पूर्ण मालकी असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्, आणि रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लिमिटेडच्या अधीन आहेत. ओ टू सी हा व्यवसाय रिलायन्स समुहाच्या अंतर्गत येतो. न्यू एनर्जी व्यवसायही मूळ कंपनीचा हिस्सा आहे. ६५ वर्षीय मुकेश अंबानी यांची ईशा, अनंत आणि आकाश अंबानी अशी तीन मुलं आहेत.
7 / 7
गेल्या वर्षी ब्लूमबर्ग न्यूजने एका अहवालात दावा केला होता की मुकेश अंबानी यांना वॉल्टन कुटुंबाची उत्तराधिकार योजना सर्वात जास्त आवडली होती. गेल्या वर्षी असेही वृत्त आले होते की मुकेश अंबानी आपल्या कुटुंबाचा हिस्सा एका ट्रस्टसारख्या संरचनेत हस्तांतरित करण्याचा विचार करत आहेत, जे लिस्टेड कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजवर नियंत्रण ठेवेल.
टॅग्स :Relianceरिलायन्सMukesh Ambaniमुकेश अंबानीIsha Ambaniईशा अंबानीbusinessव्यवसाय