शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुकेश अंबानींचा नवा डाव, ७४ अब्ज रुपये पणाला; ‘रोबोट’ खरेदी करुन ‘हे’ काम करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 10:01 AM

1 / 10
मुकेश अंबानी जगभरातील श्रीमंतांच्या यादीतील एक भारतीय नाव. रिलायन्स इंडस्ट्रीच्या माध्यमातून मुकेश अंबानी हे कोट्यवधींची उलाढाल करत आहेत. मुकेश अंबानी यांच्या जीवनाबद्दल अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. कधी त्यांच्या घरी काम करणाऱ्या कामगारांचा पगार तर कधी अंबानी कुटुंबाची लग्झरी लाईफ.
2 / 10
आता मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं(Reliance Industries)नं एडवर्ब टेक्नोलॉजीसला(Addverb Technologies) अलीकडेच १ बिलियन डॉलर म्हणजे तब्बल ७४ अब्ज रुपयांना खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली आहे.
3 / 10
ही ऑर्डर ५ जी टेक्नॉलॉजीने सुसज्ज असणाऱ्या रोबोट्ससाठी आहे. त्याचा वापर रिलायन्सच्या जामनगर येथे रिफायनरी करण्यासाठी केला जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजनं काही महिन्यांपूर्वी रोबोटिक्स स्टार्टअप Adverb Technologies ची ५४ टक्के भागीदारी घेतली आहे.
4 / 10
हा सौदा रिलायन्स इंडस्ट्रीजने रिटेल यूनिट रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड(Reliance Retail Ventures Ltd) च्या माध्यमातून केला आहे. रिलायन्स रिटेलने हा व्यवहार १३२ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ९८५ कोटी रुपयांना केला आहे.
5 / 10
मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज या रोबोट्सच्या माध्यमातून ५ जी तंत्रज्ञानाशी संबंधित काही प्रयोग करणार आहे. एडवर्बच्या डायनेमो २०० रॉबोट्सचं जामनगरच्या रिफायनरीमध्ये इन्ट्रा लॉजिस्टिक्सच्या ऑपरेशनमध्ये वापर होत आहे.
6 / 10
हे सर्व रोबोर्ट्स 5G तंत्रज्ञानाशी जोडलेले आहेत. त्यांना अहमदाबाद येथे असणाऱ्या रिमोट सर्व्हरच्या माध्यमातून कंट्रोल करण्यात येते. त्यासाठी एडवर्बच्या फ्लीट मॅनेजमेंट सिस्टम लीजनचा वापर करण्यात येतो. त्याशिवाय १ टन पेलोड कॅपिसिटीवाले डायनेमो रोबोर्ट्सचा वापर बॅगिंग लाइन ऑटोमेशनसाठी केला जातो.
7 / 10
रिलायन्स इंडस्ट्रीनं भागीदारी घेतल्यानंतर स्टार्टअप कंपनीने सांगितले की, रिलायन्ससोबत झालेल्या व्यवहारामुळे अमेरिका आणि यूरोपच्या बाजारात उतरण्यासाठी आम्हाला मदत मिळणार आहे. त्यासह रिलायन्सकडून मिळालेल्या पैशातून उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार आहे.
8 / 10
फंडिंगच्या माध्यमातून एकाच लोकेशनवर मोठं रोबोटिक्स उत्पादन प्लांट(Robotics Manufacturing Plant) लावण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कंपनी आगामी काळात हॉस्पिटल आणि विमानतळावर रोबोट डिप्लॉय करण्याची योजना आखत आहे.
9 / 10
रिलायन्ससोबत व्यवहार झाल्याने त्यात गती मिळण्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीद्वारे शेअर खरेदी केल्यानंतर एडवर्बची मार्केट व्हॅल्यू २६.५ वरुन २७ कोटीं डॉलर म्हणजे २००० कोटींपर्यंत पोहचली आहे. कंपनी सध्या नोएडा येथील प्लांटमध्ये १० हजार रॉबोट बनवत आहे.
10 / 10
एडवर्ब रिलायन्स रिटेलला सुरुवातीपासूनच फायद्यात नेत आहे. आता मोठ्या स्तरावर एडवर्बच्या रोबोर्ट्सचा वापर रिलायन्सच्या विविध उपक्रमात झाल्याचं पाहायला मिळू शकतं.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीRelianceरिलायन्स