शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Multibagger IPO: ₹१०२ वरुन ७५०० वर पोहोचला या कंपनीचा शेअर, वर्षभरात ९० लाखांचा नफा; ७३०० टक्के रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 12:36 PM

1 / 5
Multibagger IPO: यावर्षी आयपीओसाठी काही खास वर्ष राहिलं नाही. परंतु गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये अनेक कंपन्या शेअर बाजारात लिस्ट झाल्या आणि त्यांनी उत्तम रिटर्न्सही दिले.
2 / 5
यापैकीच एक कंपनी म्हणजे इकेआय एनर्जी सर्व्हिसेस (EKI energy services) ही आहे. या कंपनीनं २०२१ मध्ये आयपीओ लाँच झाल्यानंतर आतापर्यंत ७३०० टक्क्यांचा छप्परफाड रिटर्न दिला आहे.
3 / 5
इकेआय एनर्जी सर्व्हिसेसचा आयपीओ गेल्यावर्षी २०२१ मध्ये आला होता. गुंतवणूकीसाठी हा आयपीओ २४ मार्च रोजी खुला झाला होता. तसंच एप्रिल २०२१ मध्ये याचं लिस्टिंग झालं होतं.
4 / 5
या आयपीओचं इश्यू प्राईज १०२ रूपये प्रति शेअर होतं. दरम्यान हा पब्लिक इश्यू आपल्या लिस्टिंगच्या दिवशीच ३७ टक्के प्रिमिअमसोबत १४० रुपयांवर खुला झाला होता. आज या शेअर किंमत ७५०० रूपये आहे.
5 / 5
इश्यूसाठी यात १२०० शेअर्स ठेवण्यात आले होते. यासाठी गुंतवणूकदारांना १,२२,४०० रूपयांची गुंतवणूक करावी लादली. जर एखाद्या गुंतवणूकदारानं लिस्टिंगनंतर आतापर्यंत ही गुंतवणूक कायम ठेवली असती तर त्याच्या १,२२,४०० रूपयांचं मूल्य आज ९० लाख रूपये असतं. (टीप- कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंग