शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Multibagger Share Adani Group : अदानी समुहाचा 'हा' शेअर बनला रॉकेट; गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे झाले ७८ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 7:37 PM

1 / 9
भारतीय शेअर बाजाराने Q4FY22 मध्ये सुमारे 90 मल्टीबॅगर स्टॉक दिले आहेत. त्याचवेळी, FY22 मध्ये, मल्टीबॅगर स्टॉकच्या (Multibagger stock list) यादीत 190 हून अधिक शेअर्सचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, काही क्वालिटी स्टॉक्स आपल्या शेअरधारकांसाठी दीर्घ काळापर्यंत पैसे कमवून देणारे राहीले. अदानी ट्रान्समिशनचे (Adani transmission) शेअर्स त्यापैकी एक आहेत.
2 / 9
गेल्या एका वर्षात अदानी ट्रान्समिशनच्या शेअरची किंमत सुमारे 175 टक्क्यांनी वाढली आहे. तर गेल्या 6 वर्षांत ते सुमारे 35 रुपयांवरून 2701 रुपयांपर्यंत वाढले आहे. म्हणजेच या काळात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 7700 टक्के रिटर्न दिले आहेत.
3 / 9
गेल्या एका महिन्यात अदानी ट्रान्समिशनचा शेअर 2305 रुपयांवरून 2701 रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत या शेअरची सुमारे 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर YTD नुसार हा शेअर 1730 रुपयांवरून 2701 रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच या कालावधीत सुमारे 56 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
4 / 9
अदानी समूहाचा हा शेअर गेल्या 6 महिन्यांत 1748 रुपयांवरून 2701 रुपयांवर गेला आहे. या कालावधीत स्टॉकने सुमारे 54 टक्के वाढ नोंदवली आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या एका वर्षात 990 वरून 2701 रुपयांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच एका वर्षात यात सुमारे 175 टक्के वाढ दिसून आली आहे.
5 / 9
तर गेल्या 5 वर्षात या कंपनीचा शेअर 85 रुपयांवरून 2701 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत यात 3075 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
6 / 9
त्याचप्रमाणे, गेल्या 6 वर्षांमध्ये हा मल्टीबॅगर अदानी स्टॉक 34.70 रुपयांवरून (NSE वर 13 एप्रिल 2016 रोजी बंद किंमत) वरून 2701 रुपयांपर्यंत (NSE वर 13 एप्रिल 2022 रोजी बंद किंमत) वाढला आहे. या कालावधीत त्यात सुमारे 78 पट वाढ झाली आहे.
7 / 9
अदानी ट्रान्समिशनच्या शेअरच्या प्राईस हिस्ट्रीनुसार जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी अदानी समूहाच्या या शेअरमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याच्या 1 लाखाचे मूल्य आज 1.17 लाख झाले असते. तर हे YTD नुसार 1.56 लाख झाले असते.
8 / 9
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज 1.54 लाख झाले असते. तथापि, एखाद्या गुंतवणूकदाराने एका वर्षापूर्वी या अदानीच्या शेअरमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख आज 2.75 लाख झाले असते.
9 / 9
त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असेल आणि ती कायम ठेवली असेल तर त्याचं मूल्य आज 31.75 लाख रूपये झालं असतं. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते आणि 34.70 च्या पातळीवर स्टॉक खरेदी केला असेल, तर त्याचे मूल्य आज 78 लाख झाले असते.
टॅग्स :Adaniअदानीbusinessव्यवसायshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक