शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

37 पैशांच्या या शेअरनं एकाच वर्षात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे झाले 1.92 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 4:38 PM

1 / 9
आज आम्‍ही आपल्याला एका अशा शेअरसंदर्भात माहिती देत आहोत, ज्याने अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केलं, नव्हे कोट्यधीश बनवलं. या शेअरचे नाव आहे कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड (Kaiser Corporation).
2 / 9
कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडचा शेअर या वर्षातील संभाव्य मल्टीबॅगर स्टॉक्स (Multibagger stocks) पैकी एक आहे. महत्वाचे म्हणजे, कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरने (Kaiser Corporation share price) गुंतवणूकदारांना गेल्या एका वर्षात तब्बल 19,183 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
3 / 9
वर्षभरापूर्वी केवळ 37 पैशांना होता शेअर - कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडचा ​​शेअर 30 जून 2021 रोजी BSE वर केवळ 37 पैशांच्या पातळीवर होता. जो आता एका वर्षात 10 जून 2022 ला BSE वर वाढून 71.35 रुपयांवर पोहोचला आहे. या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 19,183.78 टक्के एवढा जबरदस्त परतावा दिला आहे.
4 / 9
तर गेल्या सहा महिन्यांचा विचार करता, 13 डिसेंबर 2021 रोजी BSE वर हा स्टॉक 1.52 रुपयांवर होता. तो आता वाढून 71.35 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 4,594.08 टक्के एवढा परतावा दिला आहे.
5 / 9
या वर्षाचा विचार करता, 3 जानेवारी 2022 रोजी कंपनीचा शेअर 2.92 रुपयांना होता. या शेअरने या वर्षात 2,343.49 टक्के एवढा परतावा दिला आहे. मात्र, गेल्या एक महिन्यात हा शेअर 17.70 टक्क्यांनी तोट्यात आहे. तर, गेल्या पाच ट्रेडिंग सेशन्समध्ये हा शेअर 18.50 टक्क्यांनी घसरला आहे.
6 / 9
फक्त एकाच वर्षात गुंतवणूकदार बनले कोट्यधीश - कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर प्राइसच्या पॅटर्ननुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये वर्षभरापूर्वी, 37 पैशांप्रमाणे 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक आजपर्यंत कायम ठेवली असती, तर आज त्याचे तब्बल 1.92 कोटी रुपये झाले असते.
7 / 9
या प्रमाणेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या वर्षी या शेअरमध्ये 2.92 रुपये प्रति शेअर प्रमाणे 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे आता 24.43 लाख रुपये झाले असते.
8 / 9
काय करते कंपनी? - या कंपनीची स्थापना सप्टेंबर 1993 मध्ये मुंबई येथे झाली. यानंतर, 15 मार्च 1995 रोजी कंपनीचे रूपांतर कैसर प्रेस लिमिटेड नावाने पब्लिक लिमिटेड कंपनीत करण्यात आले. 5 नोव्हेंबर 2013 रोजी कंपनीचे नाव बदलून 'कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड' असे करण्यात आले आहे.
9 / 9
कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड (केसीएल) लेबल, स्टेशनरी आर्टिकल्स, पत्रिका आणि कार्टनचा व्यवसाय करते. KCL आपल्या सहाय्यक कंपन्यांच्या माध्यमाने अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल हीट ट्रेसिंग आणि टर्नकी प्रकल्पांमध्येही काम करते.
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक