Multibagger Share 25 paise stock gives investors Rs 25 lakh multibagger share stock market
Multibagger Share : २५ पैशांच्या शेअरनं गुंतवणूकदारांना मिळवून दिले २५ लाख, एका वर्षात बदललं नशीब By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 2:43 PM1 / 7Multibagger Penny Stock: जर तुम्ही १० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्टॉरच्या शोधात असाल, तर आज आम्ही तुम्हाला एका अशा शेअर बद्दल माहिती देणार आहोत, ज्यानं आपल्या गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं. २५ पैशांचा हा शेअर आता ६ रुपयांच्या पुढे गेला आहे.2 / 7२५ पैशांच्या या पेनी शेअरनं गुंतवणूकदारांना २४४० टक्क्यांचा नफा मिळवून दिला असून तो आता ६.३५ रुपयांवर पोहोचला आहे. केवळ एका वर्षात या शेअरनं कमाल केली आहे. वर्षभरातच या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.3 / 7छप्परफाड रिटर्न देणाऱ्या या शेअरचं नाव राज रेयॉन इंडस्ट्रीज (Raj Rayon Industries Ltd) असं आहे. कंपनीचे शेअर मंगळवारी एनएसईवर ६.३५ रुपयांवर पोहोचले होते. तर दुसरीकडे बीएसईवर हा शेअर १०.२६ रुपयांवर पोहोचला आहे.4 / 7१७ मे २०२१ रोजी हा शेअर २५ पैशांवर होता. त्यानंतर १६ मे रोजी हा शेअर ६.३५ रुपये प्रति शेअरवर पोहोचला. केवळ ४० ट्रेडिंग सेशन्समध्ये या शेअरनं ५९२ टक्क्यांचं जबरदस्त रिटर्न दिलं आहे. 5 / 7महिन्याभरात हा शेअर २.९० रुपयांवरून वाढून ६.३५ रुपयांवर गेला. तर गेल्याएका महिन्यात या शेअनं ११८.९७ टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सेशन्समध्ये या शेअरमध्ये १९.८१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.6 / 7राज रेयॉनच्या शेअर हिस्ट्रीनुसार जर एखाद्या गुंतवणूकदारानं ६ महिन्यांपूर्वी यात १ लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याचं मूल्य ४.७० लाख रुपये झाले असते. गेल्या एका वर्षात या शेअरनं २४४० टक्के रिटर्न दिला आहे. 7 / 7वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत केवळ २५ पैसे होते. याचाच अर्थ गेल्या एका वर्षात या शेअरनं एक लाख रुपयांचे २५.४० लाख रुपये केले आहेत. ही कंपनी वस्त्रोद्योग क्षेत्रात सक्रिय आहे. १९९३ मध्ये स्थापन करण्यात आलेली ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications