शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Multibagger Share : ‘हा’ शेअर पोहोचला ₹५ वरून ₹५७३२ वर, ७ दिवसांच्या घसरणीवर ब्रेक; एक्सपर्ट म्हणाले…  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 3:30 PM

1 / 6
बजाज समुहाची फायनॅन्शिअल कंपनी बजाज फायनान्सचे शेअर्समध्ये गेल्या 7 दिवसांपासून होणारी घसरण शुक्रवारी थांबली. शुक्रवारी या कंपनीचा शेअर 0.27 टक्क्यांच्या वाढीसह 5,732.80 रुपयांवर बंद झाला.
2 / 6
त्याच वेळी, गुरुवारी कंपनीचे शेअर्स 5,717.20 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या शेअर्समध्ये या वर्षात आतापर्यंत एकूण 12.57 टक्क्यांची घट झाली आहे. तर गेल्या एका महिन्यात यात 10.78 टक्क्यांची घट झाली आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 3,47,081.33 कोटी रुपये आहे.
3 / 6
या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या शेअरने 10 वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांना 4340.24 टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. त्याच वेळी, 20 वर्षांच्या कालावधीत 99,813.04 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे.
4 / 6
2003 मध्ये या शेअरची किंमत 5 रुपयांच्या पातळीवर होती, जी आता 5700 रुपये झाली आहे. 22 सप्टेंबर 2022 रोजी शेअरने 7,777 रुपयांची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली होती. तर 17 जून रोजी शेअरची किंमत 5,235.60 रुपये होती. ही 52 आठवड्यांची नीचांकी पातळी आहे.
5 / 6
बजाज फायनान्सचे शेअर्स गेल्या काही आठवड्यांत जवळपास 10 टक्क्यांनी घसरले आहेत. परंतु यात रिकव्हरीची अपेक्षा केली जाऊ शकते, अशी प्रतिक्रिया एंजेल वनचे तांत्रिक आणि डेरिव्हेटिव्ह रिसर्च विभागाचे वरिष्ठ विश्लेषक ओशो कृष्णा यांनी दिली.
6 / 6
आनंद राठीचे गणेश डोंगरे म्हणाले - सध्याची वेळ पाहता गुंतवणूकीसाठी करण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. आम्ही थांबण्याची शिफारस करतो. त्याचवेळी कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने बजाज फायनान्ससाठी 'रिड्युस' असा सल्ला दिला आहे. ( टीप - या लेखात केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :share marketशेअर बाजारMONEYपैसाInvestmentगुंतवणूक