शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Multibagger Share Investment : ₹82 हून ₹954 वर गेला हा शेअर, गुंतवणूकदार मालामाल; दिग्गज गुंतवणूकदाराने घेतले १९.५० कोटींचे शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 3:25 PM

1 / 6
शेअर बाजारातील कोणत्या शेअरमधून किती परतावा मिळेल याची हमी कोणीही देऊ शकत नाही. पण सर्वांच्या नजरा दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवर आहेत. कारण अनेकांचा असा विश्वास असतो की ते ज्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात ते भविष्यात पोझिशनला गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात.
2 / 6
आशिष कचोलिया ज्यांना स्टॉक मार्केटचे 'बिग व्हेल' म्हटले जाते, त्यांनी मल्टीबॅगर स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. दिग्गज गुंतवणूकदाराने राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स लिमिटेड या कंपनीचा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडला आहे. जाणून घेऊया शेअरबद्दल अधिक माहिती.
3 / 6
गेल्या एका महिन्यात राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स लिमिटेडच्या शेअरच्या किमती 60 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यादरम्यान कंपनीच्या एका शेअरची किंमत 590 रुपयांवरून 954 रुपयांपर्यंत वाढली आहे. गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट झाले आहेत.
4 / 6
या 6 महिन्यांत राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स लिमिटेडच्या शेअरची किंमत 96 टक्क्यांनी वाढली आहे. या वर्षाच्या मध्यात कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुलीही पाहायला मिळाली होती. हेच कारण आहे की 2022 मध्ये आतापर्यंत कंपनीच्या शेअरची किंमत केवळ 32 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
5 / 6
गेल्या 5 वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किमती 1050 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यादरम्यान कंपनीच्या शेअरची किंमत 82 रुपयांवरून 954 रुपयांपर्यंत वाढली आहे. सांगायचे झाल्यास गेल्या एका आठवड्यात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 17 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
6 / 6
BSE वर उपलब्ध माहितीनुसार, आशिष कचोलिया यांनी राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स लिमिटेडचे ​​2,31,683 शेअर्स 842 रुपये दराने खरेदी केले आहेत. याचा अर्थ अनुभवी गुंतवणूकदाराने कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी 19.50 कोटी रुपये खर्च केले आहेत. 4 नोव्हेंबर 2022 रोजी ही डील झाली आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक