शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Multibagger Share : ३३ पैशांचा शेअर गेला ११०० पार, १० हजारांच्या गुंतवणूकीनं दिले ३.५० कोटींचे रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 1:11 PM

1 / 6
Multibagger Share : शेअर बाजारात सध्या अनिश्चिततेचा काळ आहे. एकीकडे अमेरिका आणि युरोपमध्ये आर्थिक मंदीचा धोका आहे. तर दुसरीकडे अशा कंपन्या मोठ्या संख्येने आहेत, ज्यांनी या संकटाच्या काळात कर्मचाऱ्यांची कपात सुरू केली आहे.
2 / 6
या सर्वांशिवाय, वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी देशांच्या संबंधित मध्यवर्ती बँका व्याजदरात सातत्याने वाढ करत आहेत. या कठीण काळात आम्ही तुम्हाला अशा शेअर्सबद्दल सांगणार आहोत ज्यांची किंमत एके काळी 1 रुपयापेक्षाही कमी होती. मात्र दीर्घकाळात त्यांनी गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.
3 / 6
पहिली कंपनी ज्योती रेजिन्स आहे. 20 जानेवारी 2003 रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 33 पैसे होती. जो आता 1,198.15 रुपयांच्या पातळीवर गेला आहे. म्हणजेच या वीस वर्षात कंपनीने आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांना 3,59,345 टक्के परतावा दिला आहे.
4 / 6
ज्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी ज्योती रेजिन्स या कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असेल तर त्याचे मूल्य आज 3.50 कोटी रूपये झाले असते. या शेअरने आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
5 / 6
गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, ज्या गुंतवणूकदाराने ज्योती रेजिन्सच्या शेअरमध्ये 6 महिन्यांपूर्वी गुंतवणूक केली असेल त्यांना आतापर्यंत 50 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न मिळाले असतील.
6 / 6
गेल्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरने शेअर बाजारात 251 टक्क्यांनी झेप घेतली आहे. ज्योती रेजिन्सचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1818.45 रुपये आहे. तर, बीएसईवर 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 322.68 रुपये आहे. (टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीबद्दल माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक