शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Multibagger Stock: याला म्हणतात छप्परफाड रिटर्न! २₹चा शेअर गेला २११७ ₹वर; १३ हजारांचे झाले कोट्यवधी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 3:56 PM

1 / 9
Multibagger Stock: आताच्या घडीला शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मात्र, काही कंपन्या आपल्या कमाल कामगिरीच्या जोरावर गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
2 / 9
एकंदर शेअर मार्केटमधील वातावरण पाहता कोणता शेअर कधी उसळी घेईल आणि गुंतवणूकदारांना मालामाल करेल, याचा कोणताही नेम नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. आम्ही अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल बोलत आहोत, ज्याने गुंतवणूकदारांना दीर्घकाळ मालामाल केले आहे.
3 / 9
गुंतवणूकदारांना भन्नाट रिटर्न देणाऱ्या कंपनीपैकी एक म्हणजे दीपक नायट्रेट (Deepak Nitrite). ही एक केमिकल उद्योगातील कंपनी असून, गेल्या काही महिन्यांमध्ये या कंपनीच्या शेअरने शेअर बाजारात धुमाकूळ घातल्याचे सांगितले जात आहे.
4 / 9
Deepak Nitrite कंपनीच्या शेअर्समधील दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे ग्राहकांना मोठा नफा झाला आहे. 2010 नंतर कंपनीच्या शेअर्सनी रॉकेट स्पीड पकडला असून, ज्या गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्समध्ये केवळ 13,000 रुपये गुंतवले होते ते अल्पावधीत कोट्यधीश झाले.
5 / 9
15 नोव्हेंबर 2002 रोजी शेअर्समधील तेजीबद्दल बोलायचे झाले तर शेअरची किंमत फक्त 2.83 रुपये होती. त्याच्या किमती एका दशकापर्यंत म्हणजे 2010 पर्यंत हळूहळू वाढल्या, पण त्यानंतर त्या झपाट्याने वाढत गेल्या. या केमिकल कंपनीच्या शेअरची किंमत 1 ऑक्टोबर 2010 रोजी 17.81 रुपये होती. त्याच वेळी, 5 ऑगस्ट 2016 रोजी तो प्रथमच 100 रुपयांच्या पातळीवर पोहोचला.
6 / 9
19 डिसेंबर 2020 रोजी, दीपक नायट्रेटच्या एका शेअरची किंमत 922 रुपये झाली होती. यानंतर, गेल्या दोन वर्षांत शेअर्सच्या वाढीला ब्रेक लागला नाही आणि 15 जानेवारी 2021 रोजी या शेअरने 1000 रुपयांची पातळी ओलांडली. गेल्या वर्षी, 14 ऑक्टोबर 2021 रोजी, तो 2897.80 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला.
7 / 9
वर्ष 2022 च्या सुरूवातीला, 14 जानेवारी रोजी दीपक नायट्रेटच्या शेअरची किंमत 2,659.85 रुपये होती, जी 20 मे 2022 रोजी 1,964.85 रुपयांपर्यंत खाली आली.
8 / 9
मात्र, पुन्हा एकदा त्यात थोडीशी सुधारणा झाली आणि आताच्या घडीला या कंपनीचा शेअर 2117 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप रु 28,901.69 कोटी आहे.
9 / 9
दरम्यान, हा शेअर गुंतवणूकदारांसाठी लकी ठरला असला तरी, या शेअरमध्ये यापूर्वी झालेल्या घसरणीमुळे ब्रोकरेज हाऊसने विक्रीचे रेटिंग कायम ठेवले आहे. मात्र, त्याच्या शेअर्समध्ये रिकव्हरी टप्पाही सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक