Multibagger stock safari industries shares of Rs 2 reached on 2,940 Gave 145000 percent return
याला म्हणतात बम्पर परतावा...! 2 रुपयांचा शेअर थेट 2,940 वर पोहोचला; दिला 145000 टक्क्यांचा छप्परफाड परतावा By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 1:22 PM1 / 8ट्राली बॅग आणि ट्रॅव्हल बॅग तयार करणारी कंपनी सफारी इंडस्ट्रीजने गेल्या काही दिवसांत जबरदस्त परतावा दिला आहे. या कंपनीचा शेअर 2 रुपयांवरून थेट 3000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहेत. 2 / 8या काळात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,45,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 2949 रुपये आहे. तर निचांक 879.90 रुपये एवढा आहे.3 / 81 लाखाचे केले 14 कोटी रुपये - सफारी इंडस्ट्रीजचा शेअर 11 जून 2004 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर (BSE) 2 रुपयांवर होता. तो 15 जून 2023 रोजी बीएसईवर 2940 रुपयांवर पोहोचला आहे. या काळात सफारी इंडस्ट्रीजच्या शेअरने 1,46,500 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 4 / 8जर एखाद्या व्यक्तीने 11 जून 2004 रोजी सफारी इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती कायम ठेवली असती, तर आता त्याचे 14.74 कोटी होती.5 / 810 वर्षांत शेअरने घेतली 4000 टक्क्यांची उसळी - सफारी इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये गेल्या 10 वर्षांत जबरदस्त तेजी आली आहे. कंपनीचा शेअर 7 जून 2013 रोजी BSE मध्ये 71 रुपयांवर होता. तो 15 जून 2023 रोजी बीएसईवर 2940 रुपयांवर ट्रेड करत आहे. 6 / 8या काळात कंपनीच्या शेअरने 4030 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्याने 10 वर्षांपूर्वी सफारी इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता त्याचे 41.53 लोख रुपये जाले असते.7 / 8या काळात कंपनीच्या शेअरने 4030 टक्क्यांचा परतावा दिला आहे. जर एखाद्याने 10 वर्षांपूर्वी सफारी इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता त्याचे 41.53 लोख रुपये जाले असते.8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications