शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Multibagger Stock : हे आहेत टाटाचे तीन जबरदस्त शेअर, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; तुमच्याकडे आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 6:25 PM

1 / 8
शेअर बाजारात चढ-उतर सुरू असतानाही अनेक शेअर्स जबरदस्त परतावा देत असतात. ब्रोकरेज हाऊसेसदेखील अशा शेअर्सवर बुलीश असतात. मात्र, अशा अस्थिरता असलेल्या शेअर बाजारातून नफा मिळविण्याची आपली इच्छा असेल तर, ही बातमी खास आपल्यासाठी आहे.
2 / 8
टाटा समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून आपण बम्पर परतावा मिळवू शकता. सध्या आपण टाटा ग्रुपच्या ट्रेंट, टीसीएस आणि टाटा स्टील या तीन कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता. या शेअर्समधून जबरदस्त परतावा मिळण्याची शक्यता आहे.
3 / 8
या तीनही स्टॉक्सवर ब्रोकरेज हाऊसेज बुलीश आहेत. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल फायनांशिअल सर्व्हिसेसने देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS च्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्लादिला आहे. तसेच, टीसीएसच्या शेअरवर 3870 रुपयांचे टार्गेट निश्चित केले आहे.
4 / 8
मोतीलाल ओसवालनुसार, हा शेअर सध्याच्या पातळीपेक्षा 16 टक्क्यांहून अधिकचा परतावा देऊ शकतो. मात्र या शेअरची सप्टेंबर तिमाहीतील कामगिरी फारशी चांगली नाही. मात्र असे असले तरी, टीसीएसचा नफा 8 टक्क्यांनी वाढून 10,431 कोटी रुपये झाला आहे.
5 / 8
काय म्हणतात एक्सपर्ट? - एकूण 39 पैकी 19 विश्लेषकांनी टीसीएसचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ज्यांच्याजवळ हा स्टक आहे, अशा लोकांना 12 विश्लेषकांनी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तर केवळ 8 जणांना या स्टॉकमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. अर्थात तज्ज्ञ मंडळीही या स्टॉकच्या बाजूने आहेत.
6 / 8
टाटा स्टीलसंदर्भात काय म्हणतायत तज्ज्ञ?- टाटा स्टीलच्या शेअर संदर्भात बोलायचे झाल्यास, तज्ज्ञ हे शअर खरेदीचा सल्ला देत आहेत. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसनेही टाटा स्टीलवर खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसने टाटा स्टीलवर अल्प मुदतीसाठी रु. 115 चे टार्गेट दिले आहे, तर स्टॉप लॉस रु. 105 निश्चित केला आहे.
7 / 8
इतर विश्लेषकांसंदर्भात बोलायचे झाल्यास, 29 पैकी 13 जणांनी टाटा स्टीलच्या Strong Buy चा सल्ला दिला आहे. आणि चार जणआंनी Buy, 8 जणांनी होल्ड आणि 4 जणांनी विकण्याचा सल्ला दिला आहे.
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :Tataटाटाshare marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक