शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Multibagger Stock : ‘या’ कंपनीच्या शेअरनं दिला १९१३४ रूपयांचा नफा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 8:48 AM

1 / 6
Multibagger Stock : MRF हा भारतीय शेअर बाजारातील सर्वात महाग स्टॉक आहे. मंगळवारी, कंपनीच्या एका शेअरचे मूल्य 82825.45 रुपये होते, परंतु आज आपण त्याबद्दल नाही तर दुसऱ्या सर्वोच्च मूल्याच्या शेअरबद्दल बोलणार आहोत.
2 / 6
आपल्या गुंतवणूकदारांना या शेअरनं मालमाल केलं आहे. पेज इंडस्ट्रीज हा NSE वर दुसरा सर्वात महाग स्टॉक आहे. कंपनीच्या एका शेअरची सध्याची किंमत 52202.90 रुपये आहे.
3 / 6
पेज इंडस्ट्रीजचा शेअर इतका महाग असूनही एका वर्षात त्याने 57.86 टक्के परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी पेज इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 33068.85 रुपये होती आणि या काळात या शेअरने प्रति शेअर 19134.05 रुपये नफा दिला आहे.
4 / 6
पेज इंडस्ट्रीजचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 53616.35 रुपये आहे आणि नीचांकी स्तर 32252.50 रुपये आहे. या शेअरने गेल्या आठवड्यात 4.91 टक्के परतावा दिला आहे. त्याचवेळी, गेल्या एक महिन्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, पेज इंडस्ट्रीजच्या शेअर्सचे भाव 4.58 टक्क्यांनी वधारले आहेत.
5 / 6
दरम्यान, या शेअरने तीन महिन्यांत 24.14 टक्के आणि तीन वर्षांत 147.59 टक्के परतावा दिला आहे. पाच वर्षांत 180.31 टक्के परतावा देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. दरम्यान, 21 पैकी केवळ 10 बाजारतज्ज्ञांनी हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
6 / 6
तर दुसरीकडे 8 तज्ज्ञांनी तो होल्ड करण्याचा सल्ला दिलाय. एकूण सहा सल्लागारांनी विक्री सल्ला दिला आहे. सात दिवसांपूर्वी आयसीआयसीआय सिक्युरिटीजने या शेअरची किंमत 52000 पर्यंत जाण्याची अपेक्षा केली होती आणि आता त्याने ही पातळी देखील ओलांडली आहे. ( टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक