शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Multibagger Stock : दोन वेळा बोनस शेअर्स, १ लाखांचे झाले १० कोटी; तुमच्याकडे आहे का हा शेअर?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 10:40 PM

1 / 6
Multibagger Stock : बिर्लासॉफ्ट लिमिटेड (Birlasoft Ltd.) ही 9,465.58 कोटी रूपये मार्केट कॅप असलेली मिड कॅप कंपनी आहे. ही आयटी क्षेत्रातील कंपनी आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, बिर्लासॉफ्ट लिमिटेड ही कर्जमुक्त कंपनी असून या कंपनीच्या शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीत मल्टीबॅगर (Multibagger) परतावा दिला आहे.
2 / 6
बिर्लासॉफ्ट लिमिटेडचा शेअर्स 338.05 रूपयांवर बंद झाले, यापूर्वी हा शेअर 328.60 रूपयांवर बंद झाला होता. यापूर्वीच्या तुलनेत यात च्बंदच्या तुलनेत 2.88 टक्क्याची वाढ झाली. 12 जानेवारी 2001 रोजी शेअरची किंमत 1.34 रूपये होती. ती आता वाढून 338.05 रूपयांपर्यंत वाढली आहे.
3 / 6
या कालावधीत, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25,127.61 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने कंपनीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून या स्टॉकवर 1 लाख गुंतवले असतील तर त्याला त्यावेळी 74,626 शेअर्स मिळाले असते.
4 / 6
4 जानेवारी 2007 रोजी काही गुंतवणुकीनंतर कंपनीने 1:1 गुणोत्तरासह बोनस जारी केला. यानंतर गुंतवणूकदारांच्या शेअर्सची संख्या 1,49,252 शेअर्सवर गेली. यामुळे शेअर्सची किंमत आणि व्हॉल्यूम दोन्ही वाढले. पुन्हा 2012 मध्ये, कंपनीने 1:1 च्या प्रमाणात बोनस जारी केला आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांना लाभ मिळाला.
5 / 6
या कालावधीत शेअर्सची संख्या 2,98,504 पर्यंत वाढली असून, शेअरची किंमतही वाढली. म्हणजेच 21 वर्षांपूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य 1000 पटीने वाढले आहे. म्हणजेच 21 वर्षांपूर्वी गुंतवलेल्या एक लाख रुपयांचे मूल्य आता 10 कोटी रूपये झाले आहे.
6 / 6
गेल्या 5 वर्षात या शेअरने 421.60 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. परंतु गेल्या 1 वर्षात स्टॉक 17.29 टक्क्यांनी घसरला आहे आणि 2022 मध्ये आतापर्यंत स्टॉक 40.43 टक्क्यांनी घसरला आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक