शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Multibagger Stocks : १० हजारांचे झाले ३६ लाख; २ रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या शेअरनं केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 4:39 PM

1 / 9
अवंती फीड्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 675 रुपये आहे. त्याच वेळी, शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 411.85 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 8,100 कोटी रुपये आहे.
2 / 9
कमी किंमत असलेल्या एका स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. हा शेअर अवंती फीड्स लिमिटेड (Avanti Feeds) या कंपनीचा आहे.
3 / 9
अवंती फीड्सच्या शेअर्सने अवघ्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. कंपनीच्या शेअर्सची कामगिरी इतकी चांगली आहे की काही हजार रुपये गुंतवणारे लोकही कोट्यधीश झाले आहेत.
4 / 9
अवंती फीड्सचा स्टॉक एकदा 2 रुपयांपेक्षा कमी होता आणि त्याने आता लोकांना 36,000 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत.
5 / 9
11 फेब्रुवारी 2010 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर अवंती फीड्सचे शेअर्स 1.65 रुपये इतके होते. 11 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 596.55 रुपयांच्या पातळीवर आहेत.
6 / 9
कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 12 वर्षांत सुमारे 36,150 टक्के रिटर्न्स दिले आहेत. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 11 फेब्रुवारी 2010 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये गुंतवले असतील आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर आजच्या तारखेनुसार त्याची ती रक्कम 36.15 लाख रुपये इतकी झाली असती.
7 / 9
जर एखाद्या व्यक्तीने 11 फेब्रुवारी 2010 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याची सध्याची किंमत 3.6 कोटी रुपयांच्या जवळपास गेली असती.
8 / 9
अवंती फीड्सच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 675 रुपये आहे. त्याच वेळी, शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 411.85 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 8,100 कोटी रुपये आहे.
9 / 9
अवंती फीड्सच्या शेअर्सचे ऑल टाईम रिटर्न 112,320 टक्के आहे. एकेकाळी कंपनीचे शेअर्स 53 पैशांवरही गेले होते.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक