शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Multibagger Stocks 2022: या वर्षी ‘या’ ५ शेअर्सनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, १००० टक्क्यांपेक्षाही अधिक मिळाले रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 2:21 PM

1 / 8
Multibagger Stocks 2022: 2022 या वर्षात शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. काही महिन्यांपूर्वी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली होती. त्यानंतर आता शेअर बाजारात पुन्हा वाढ होताना दिसतेय. अनेकांना मध्यंतरीच्या कालावधीत मोठा फटकाही बसला होता. परंतु असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना (Best Multibagger Stocks 2022) मालामालही केलं आहे.
2 / 8
या शेअर्सने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळाला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा शेअर्सबद्दल सांगणार आहोत (Best Multibagger Stocks 2022), ज्यांनी 2022 मध्ये गुंतवणूकदारांना 1000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. तरीही या शेअर्समध्ये तेजी कायम आहे.
3 / 8
येत्या काळात या समभागांमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा गुंतवणूकदारांना आहे. आर्थिक सल्लागाराचा सल्ला न घेता शेअर बाजारातील कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करणे आर्थिकदृष्ट्या हानीकारक ठरू शकते. अशा स्थितीत शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया कोणते आहेत हे स्टॉक्स.
4 / 8
एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड - ही स्मॉल कॅप कंपनी वस्त्रोद्योग क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीचे बाजार भांडवल 2,315 कोटी रुपये आहे. 2022 मध्ये या कंपनीच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत, समभागाने गुंतवणूकदारांना 14,021 टक्क्यांहून अधिक मजबूत परतावा दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात या स्टॉकची किंमत सुमारे 44 रुपये होती. तर मे महिन्यात या शेअरची किंमत 1600 रुपयांहून अधिक झाली होती. मात्र, त्यानंतर त्यात घसरण झाली. मात्र, गेल्या महिनाभरापासून या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी म्हणजेच 9 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक 680.20 रुपयांवर बंद झाला.
5 / 8
कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड - कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड मुद्रण आणि पॅकेजिंग सेवा प्रदान करते. कंपनी लेबल, पॅकेजिंग साहित्य, मासिके आणि कार्टन्स छापते. या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकने एका वर्षात तब्बल 13,900 टक्के परतावा दिला आहे. कंपनीचे बाजार भांडवल 309 कोटी रुपये आहे. सध्या कंपनीचा शेअर 56.50 रुपयांवर आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 130 रुपये आहे. शुक्रवारी म्हणजेच 9 डिसेंबर 2022 रोजी कॅसर कॉर्पोरेशनचा स्टॉक 57 रुपयांच्या पातळीवर उघडला. यादरम्यान त्यात घसरण दिसून आली.
6 / 8
राज रेयॉन इंडस्ट्रीज लिमिटेड - राज रेयॉन इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरनं एका वर्षात गुंतवणूकदारांना 1570 टक्क्यांचा परतावा दिला आहे. राज रेयॉन इंडस्ट्रीज लिमिटेड ही पूर्वी राज रेयॉन लिमिटेड म्हणून ओळखले जात असे. ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. हे पॉलिस्टर टेक्सच्युराइज्ड यार्न, ओरिएंटेड यार्न आणि पूर्णपणे तयार यार्नचं काम करते. राज रेयॉन इंडस्ट्रीजचा शेअरचा सध्याचा बाजारभाव 34 रुपये आहे. या शेअरचा 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तर 34 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांक स्तर 0.36 रुपये होता. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 1921 कोटी रुपये आहे. हा शेअर अजूनही तेजीत आहे.
7 / 8
अंबर प्रोटीन इंडस्ट्रीज लिमिटेड - अंबर प्रोटीन इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. शेअरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर या शेअरने गुंतवणूकदारांना 2905 टक्के इतका चांगला परतावा दिला आहे. अंबर प्रोटीन इंडस्ट्रीजची स्थापना 1992 मध्ये अहमदाबाद येथे झाली. कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये अंकुर रिफाइंड कॉटनसीड ऑइल, अंकुर रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल, अंकुर रिफाइंड सोयाबीन ऑइल आणि अंकुर रिफाइंड कॉर्न ऑइल यांचा समावेश आहे. या कंपनीचा शेअर सध्या 549 रुपयांवर आहे. या शेअरनं 843 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर आणि 15 रुपयांचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर गाठला होता. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 262.20 कोटी रुपये आहे.
8 / 8
सेजल ग्लास लिमिटेड - सेजल ग्लास लिमिटेड ही सेजल ग्रुपची प्रमुख कंपनी आहे. स्मॉल कॅप कंपनीची स्थापना 1998 मध्ये झाली आणि ती ग्लास क्षेत्रात कार्यरत आहे. आज, कंपनी भारतातील ग्राहकांच्या गरजा, सोयी आणि प्राधान्ये यांचे सतत विश्लेषण आणि पूर्तता करत आहे. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 238 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सने यावर्षी गुंतवणूकदारांना सुमारे 1638 टक्के परतावा दिला आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक