अदानी ग्रुपच्या 6 शेअर्सची कमाल, दिला ढासू परतावा; फक्त दोन वर्षांत 1 लाखाचे केले 66 लाख By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 8:51 PM
1 / 10 कोरोना महामारीनंतर शेअर बाजारात काही शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. यात अदानी ग्रुपच्या (Adani Group), अदानी पॉवर, अदानी एंटरप्रायजेस, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट्स आणि अदानी ग्रीन एनर्जी, या सर्वच्या सर्व सहा शेअर्सचा समावेश आहे. 2 / 10 अदानी ग्रुपच्या या सर्वच्या सर्व सहा शेयर्सनी गेल्या दोन वर्षांत आपल्या शेअरधारकांना मल्टीबॅगर रिटर्न (Multibagger return) दिला आहे. जर एखाद्या शेयरधारकाने दोन वर्षांपूर्वी या सहा मल्टीबॅगर शेअर्समध्ये प्रत्येकी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्यांचे तब्बल 66 लाख रुपये झाले असते. 3 / 10 1. अदानी पॉवर - अदानी समूहाचा हा शेअर एनएसईवर 21 ऑगस्ट 2020 रोजी 39.15 रुपयांवर बंद झाला होता. आता अदानी पॉवरच्या शेअरची किंमत 410.65 रुपये आहे. अर्थात गेल्या दोन वर्षांत अदानी पॉवरच्या शेअरची किंमत जवळपास 10.50 पट वाढली आहे. त्यामुळे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी अदानी पॉवरच्या मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर, त्याच्या 1 लाखाचे आज 10.50 लाख रुपये झाले असते. 4 / 10 2. अदानी एंटरप्रायजेस - या मल्टीबॅगर स्टॉकचा शेअर 21 ऑगस्ट 2020 रोजी NSE वर 233.35 रुपयांच्या पातळीवर होता, तर आता या शेअरची किंमत 3,127 रुपये एवढी झाली आहे. म्हणजेच गेल्या दोन वर्षांत अदानी समूहाच्या या शेअरने 13.40 पट एवढा परतावा दिला आहे. अर्थात, जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज 1 लाख रुपयांचे 13.40 लाख रुपये झाले असते. 5 / 10 3. अदानी ग्रीन एनर्जी - अदानी ग्रुपचा हा शेअर 21 ऑगस्ट 2020 रोजी 376.55 रुपयांवर बंद झाला होता. आता अदानी ग्रीनच्या शेअरची किंमत 2,422 रुपये एवढी आहे. अर्थात या स्टॉकने गेल्या दोन वर्षांत 6.45 पट एवढा परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे 6.45 लाख रुपये झाले असते. 6 / 10 4. अदानी ट्रान्समिशन - अदानी ग्रुपच्या या कंपनीचा शेअर 21 ऑगस्ट 2020 रोजी एनएसईवर 272.10 रुपयांच्या पातळीवर होता. आता या शेअरची किंमत 3,612 रुपयांवर आहे. गेल्या दोन वर्षांत हा मल्टीबॅगर स्टॉक 13.25 पटींनी वाढला आहे. जर गेल्या दोन वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 13.25 लाख रुपये झाले असते. 7 / 10 5. अदानी टोटल गॅस - अदानी समूहाच्या या कंपनीचा शेअर बीएसईवर 21 ऑगस्ट 2020 रोजी 165.55 रुपयांवर होता. आता याची किंमत 3,380.80 रुपयांवर गेली आहे. अर्थात गेल्या दोन वर्षांत या शेअरने 20.40 पट नफा दिला आहे. यामुळे, एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या दोन वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर त्याच्या 1 लाख रुपयांचे आता तब्बल 20.40 लाख रुपये झाले असतील. 8 / 10 6. अदानी पोर्ट्स - अदानी समूहाच्या या शेअरची किंमत गेल्या दोन वर्षांत 354.35 रुपयांवरून 870 रुपयांवर पोहोचली आहे. हा शेअर साधारणपणे 2.50 पट वधारला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या दोन वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर अदानी स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे 2.50 लाख रुपये झाले असते. 9 / 10 अर्थात, एखाद्या गुंतवणूकदाराने अदानी समूहाच्या या कंपन्यांमध्ये प्रत्येकी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर या मल्टीबॅगर अदानी शेयर्समध्ये त्यांची शुद्ध संपत्ती जवळपास 66.50 लाख रुपये (10.50 लाख + 13.40 लाख + 6.45 लाख + 13.25 लाख + 20.40 लाख + 2.50 लाख) एवढी झाली असती. 10 / 10 (टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा