Multibagger stocks to watch today jubilant foodworks ltd infosys sbi and others
Multibagger Stock : SBI, Infosys सह 4 स्टॉक करून देतील छप्परफाड कमाई; एकाच वर्षात व्हाल मालामाल By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 2:19 PM1 / 7शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची नजर रोजच बाजाराच्या अप-डाऊवर असते. जगभरातील बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येतो. अशा स्थितीत, जर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दर्जेदार स्टॉक्सचा समावेश करायचा असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी असे काही स्टॉक्स घेऊन आलो आहोत. जेथे गुंतवणूक करून आपण चांगला नफा मिळवू शकता.2 / 7आपण ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल (Motilal Oswal) च्या टॉप रिसर्च आयडियामध्ये स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू शकता. ब्रोकरेजने 1 वर्षापेक्षा अधिकच्या टाइम फ्रेमसह या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. इन निवडक स्टॉक्स (High Return stock today)मध्ये SBI, Infosys, Maruti आणि Jubilant Foodworks यांचा समावेश आहे. 3 / 7State Bank of India - SBI या देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचा बाजार मजबूत आहे. मोतीलाल ओसवाल यांनी एसबीआयच्या स्टॉकमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. याची प्रती शेअर टार्गेट प्राइस 725 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. अशा प्रकारे, याच्या करंट प्राइस 515 रुपयांचा विचार करता, प्रती शेअर 210 रुपये अथवा जवळपास 41 टक्के एवढा रिटर्न मिळू शकतो. म्हणजेच आपण येथे पैसे लावल्यास, आपल्याला चांगला नफा मिळू शकते.4 / 7Jubilant FoodWorks Ltd - मोतीलाल ओसवाल यांनी जुबलिएंट फूडवर्क्सच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. याची प्रति शेयर टारगेट प्राइस 4200 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. अशा प्रकारे करंट प्राइस 2,999 रुपयांचा विचार केल्यास प्रती शेअर 1201 रुपये अथवा जवळपास 40 टक्के रिटर्न मिळू शकतात. अर्था आपल्याला यात चांगला नफा मिळू शकतो.5 / 7Infosys Ltd - इन्फोसिस लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोतीलाल ओसवाल यांच्यासह इतर ब्रोकरेज हाऊसनीही गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. याची प्रती शेअर टारगेट प्राइस 2310 रुपये ठेवण्यात आली आहे. अशा प्रकारे करंट प्राइस 1,705.95 रुपयांचा विचार करता, प्रती शेअर 604 रुपये अथवा जवळपास 35 टक्के रिटर्न मिळू शकतात. अर्थात एका वर्षाचा विचार करता, इंफोसिस आपल्यासाठी चांगला सिद्ध होऊ शकतो.6 / 7Maruti Suzuki India Ltd मोतीलाल ओसवाल यांनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला आहे. याची प्रति शेयर टारगेट प्राइस 10,300 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. अशा प्रकारे करंट प्राइस 8,544 रुपयांचा विचार करता, प्रती शेअर 1,756 रुपये अथवा जवळपास 20 टक्के रिटर्न मिळू शकतात.7 / 7(टीप - येथे केवळ शेअर्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications