शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Multibagger Stocks : 9 महिन्यांत 550% परतावा, आता कंपनी फ्रीमध्ये वाटतेय शेअर; मालामाल होण्याची मोठी संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 4:01 PM

1 / 8
शेअर बाजारात असे अनेक शेअर असतात ज्यांमधून चांगल्या परताव्यासाठी गुंतवणूकदारांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. पण याच बरोबर, काही शेअर असेही असतात, जे आपल्या गुंतवणूकदारांना अत्यंत कमी काळात मालामाल करून टाकता. असाच एक शेअर म्हणजे, स्प्रेकिंग एग्रो इक्विपमेंट लिमिटेडचा (Sprayking Agro Equipment Share) आहे.
2 / 8
या शेअरने गेल्या 9 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 550% एवढा तगडा परतावा दिला आहे. खरे तर मल्टीबॅगर परतावा देणारी ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे. गुरुवारी बीएसईवर कंपनीचा शेअर 131.95 रुपयांवर बंद झाला होता. तसेच, कंपनीचे मार्केट कॅप 83.67 कोटी रुपये होते.
3 / 8
स्प्रेकिंग अॅग्रो कॅपिटल ही कंपनी गुड्स इंडस्ट्रीशी संबंधित आहे. ही कंपनी ब्रास फिटिंग्ज, फोर्जिंग इक्विपमेंट, ट्रान्सफॉर्मरचे पार्ट्स आणि इतर कस्टमाइज्ड ब्रास तयार करते. विशेष म्हणजे बंपर परताव्यानंतर आता ही कंपनी बोनस शेअर्स देणार आहे.
4 / 8
बोनस शेअर देतेय कंपनी - स्प्रेकिंग अॅग्रो इक्विपमेंटने बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 2:3 च्या प्रमाणात बोनस शेअर देणार आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेटही निश्चित केली आहे. ही 25 एप्रिल 2023 आहे. अर्थात, 25 एप्रिलपर्यंत कंपनीचे शेअर विकत घेतल्यास आपण बोनस शेअर्ससाठी पात्र असाल.
5 / 8
9 महिन्यांत 550% परतावा - या शेअरने गेल्या 9 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. या गेल्या 9 महिन्यांत या शेअरने जवळपास 550% एवढा परतावा दिला आहे. गेल्या 3 वर्षांचा विचार करता, या शेअरने 896% परतावा दिला आहे. तर गेल्या 5 वर्षांचा विचार करता 486.44 टक्के एवढा परतावा दिला आहे.
6 / 8
स्प्रेकिंग अॅग्रोचा शेअर 27 मार्च 2020 रोजी BSE वर 13.25 रुपयांवर होती. हा शेअर आता 131.95 रुपयांवर आला आहे. हा स्मॉल कॅप स्टॉक या वर्षात आतापर्यंत 215 टक्क्यांची वधारला आहे. 11 जानेवारी 2023 रोजी हा शेअर केवळ 41.80 रुपयांवर होता.
7 / 8
अनेक देशांत कस्टमर्स - स्प्रेक्रिंग अॅग्रोचे ग्राहक केवळ भारतातच नाही, तर अनेक देशांमध्ये आहेत. युरोप, यूएसए, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूएई आणि दक्षिण आफ्रिका येथेही कंपनीचे ग्राहक आहेत. या कंपनीत प्रमोटर्स शेयरहोल्डिंग 36.41 टक्के एवढी आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 131.95 रुपये, तर नीचांक 20.10 रुपये एवढा आहे.
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक