multibagger vinati organics shares delivered multifold returns in bse share market know details
याला म्हणतात छप्परफाड रिटर्न! ७५ पैशांचा शेअर २००० ₹वर; १ लाखाचे झाले २७.२८ कोटी By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 8:45 AM1 / 9शेअर बाजार म्हणजे सट्टा की अभ्यासपूर्ण गुंतवणूक? याचे उत्तर प्रत्येकाच्या मनात असते. जो शेअर बाजाराकडे जसे पाहतो तसे त्यास दिसते. कोणताही अभ्यास न करता बाजारात खेळणे म्हणजे सट्टा. अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास यात आपली संपत्ती अनेक पटींनी वाढण्याची शक्यता असते.2 / 9आताच्या घडीला शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अनेकविध कंपन्या आपले आयपीओ सादर करत आहेत. मात्र, काहीच कंपन्यांचे आयपीओ रॉकेट स्पीड पकडून गुंतवणूकदारांना मालामाल करताना दिसत आहेत. 3 / 9कोरोना संकट काळात अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर छप्परफाड रिटर्न्स दिली. अनेक क्षेत्रातील कंपन्यांनी तगडा नफा कमावत गुंतवणूकदारांना लाभांशाच्या रुपाने आपल्या आनंदात सहभागी करून घेतले. यापैकी कमाल कामगिरी केलेली कंपनी म्हणजे Vinati Organics.4 / 9Vinati Organics या कंपनीचा केवळ ७५ पैशांचा शेअर तब्बल २ हजारांच्या वर पोहोचला आहे. सध्या कंपनीचे शेअर्स सार्वकालिक उच्चांकावर असून, यामुळे गुंतवणूकदारही मालामाल झाले आहेत. विनती ऑरगॅनिक्स कंपनीचा शेअर ५२ आठवड्यांच्या हाय लेव्हलवर आहे. 5 / 9७ नोव्हेंबर २००३ रोजी BSE वर विनती ऑरगॅनिक्सचे शेअर्स ७५ पैशांच्या पातळीवर होते. कंपनीचे शेअर्स २४ मे २०२२ रोजी BSE वर २०२४ रुपयांच्या पातळीवर आहेत. 6 / 9या कालावधीत कंपनीच्या समभागांनी २००,००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने ७ नोव्हेंबर २००३ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे २७.२८ कोटी रुपये झाले असते.7 / 9विनती ऑरगॅनिक्सच्या समभागांनी गेल्या ९ वर्षांपेक्षा कमी कालावधीत जबरदस्त परतावा दिला आहे. विनती ऑरगॅनिक्सचे शेअर्स ५० ते २ हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत.8 / 9६ सप्टेंबर २०१३ रोजी कंपनीचे शेअर्स ४४.५८ रुपयांच्या पातळीवर होते. २४ मे २०२२ रोजी कंपनीचे शेअर्स २०२४ रुपयांच्या पातळीवर आहेत. 9 / 9जर एखाद्या व्यक्तीने ६ सप्टेंबर २०१३ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे ४५.८९ लाख रुपये झाले असते. आणखी वाचा Subscribe to Notifications