शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Multibagger Stock : 'या' पेनी स्टॉकनं ६ महिन्यांत १ लाखांचे केले १७ कोटी; ३५ पैशांच्या शेअरनं केलं कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 2:24 PM

1 / 7
Multibagger Crorepati Sel Manufacturing Company Ltd Stock : आज आम्ही तुम्हाला एका मल्टीबॅगर शेअरबद्दल सांगत आहोत, ज्या शेअरनं अवघ्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. या स्टॉकने ६ महिन्यांत १ लाख ७५ हजार टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत.
2 / 7
या स्टॉकचं नाव आहे सेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि. (Sel Manufacturing Company Ltd). गुरूवारी या कंपनीचा शेअर NSE वर ४.९९ टक्क्यांनी वाढून ६४३.५५ रुपयांवर बंद झाला. तो या वर्षातील संभाव्य मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत आहे.
3 / 7
हा मल्टीबॅगर स्टॉक २७ ऑक्टोबर २०२१ रोजी NSE वर ३५ पैशांच्या पातळीवर बंद झाला होता. सहा महिन्यांनंतर आता या शेअरची किंमत ६४३.५५ रुपयांवर पोहोचली आहे. या कालावधीत या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना १ लाख ७५ हजार टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत.
4 / 7
या वर्षी २०२२ मध्ये, हा शेअर ४४.४० (३ जानेवारी २०२२) वरून ६४३.५५ रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत या शेअरनं १,२८० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे.
5 / 7
या शेअरने एका महिन्यात १२९ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी शेअरची किंमत २६७.६५ रुपये होती. त्याच वेळी, गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये या स्टॉकची किंमत २२ टक्क्यांनी वाढली आहे.
6 / 7
टेक्सटाईल कंपनी Sel Manufacturing Company Ltd च्या शेअर प्राईजच्या हिस्ट्रीनुसार जर कोणत्याही गुंतवणूकदारानं सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचं मूल्य आज १७.१५१ कोटी रुपये इतकं झालं आहे.
7 / 7
जर एखाद्यानं या वर्षी शेअरमध्ये ४४.४० रुपये मूल्यावर १ लाख रुपये गुंतवले असते तर त्याचं मूल्य आज २.२९ लाख रुपये असतं. याचाच अर्थ अवघ्या काही कालावधीत ही रक्कम दुप्पट झाली असती.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक