1 / 8भारतात कधी काय होईल, कोणाचे नशीब कधी पालटेल याचा नेम नाहीय. आता हेच बघा ना दोन वर्षांपूर्वी ज्या कंपनीकडे कच्च्या तेलाची वाहतूक करणारे दोन टँक नव्हते, त्या कंपनीकडे आज ५० हून अधिक टँक आहेत. महत्वाचे म्हणजे जगात ५० हून अधिक टँक हे फक्त २० कंपन्यांकडेच आहेत. या कंपनीच्या रॉकेट स्पीडमुळे ती चर्चेत आली आहे. 2 / 8गतिक शिपिंग मॅनेजमेंट असे कंपनीचे नाव आहे. या कंपनीला दोन वर्षांपूर्वी फार कमी लोक ओळखत होते. आज तिची गणती जगातील सर्वात मोठ्या ऑईल शिपिंग फर्ममध्ये होत आहे. इंडिया टुडेने यावर वृत्त दिले आहे. 3 / 8Gatik Shipping Management ने दोन वर्षांत एवढे यश मिळविले आहे. २०२१ मध्ये या कंपनीकडे दोन ऑईल टँक होते. जसे रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु झाले तसे या कंपनीने पन्नासहून अधिक टँक खरेदी केले. जागतिक स्तरावर या कंपनीकडे लक्ष वेधले गेले आहे. 4 / 8फायनान्शिअल टाईम्सनुसार २०२१ च्या तुलनेत एप्रिल २०२३ पर्यंत मालवाहक जहाजांचा आकडा ५० हून अधिक झाला आहे. रशियावर प्रतिबंध लागू झाल्यावर कंपनीने कथितरित्या मार्च २०२२ पासून आतापर्यंत ५६ जहाजांचे अधिग्रहण केले आहे. यापैकी १३ जहाज डिसेंबर २०२२ मध्ये घेतले आहेत. 5 / 8एवढ्या झपाट्याने कंपनी ऑईल टँकर कोणाकडून खरेदी करते, कुठून एवढा पैसा आणतेय याची कोणालाच माहिती नाहीय. या जहाजांची किंमत जवळपास १.६ अब्ज डॉलर्स एवढी आहे. रिपोर्टनुसार ही जहाजे युक्रेन युद्धानंतर खरेदी केलेली आहेत. 6 / 8शिपिंग बिझनेसमधील एका तज्ज्ञाने आजतकला नाव न सांगण्याच्या अटीवर कंपनीचे त्याच्या महत्त्वाच्या भागधारकांशी चांगले संबंध आणि नजिकता असल्याचे हे संकेत आहेत. व्यवसायात एवढ्या अचानक आणि मोठ्या प्रमाणात वाढ होण्यामागे नक्कीच एखादी स्टोरी असू शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तेलवाहतूक कंपनीचे मूळ आणि मालकीही एकप्रकारचे गूढच बनलेली आहे. 7 / 8या कंपनीचे कोणतेही कार्पोरेट रेकॉर्ड उपलब्ध नाहीय. या कंपनीचा रिजस्टर्ड पत्ता हा बुएना विस्टा शिपिंगसोबतच्या मुंबईतील एका बंद पडलेल्या मॉलचा आहे. बुएना देखील एक रहस्यमयी कंपनी आहे. दोन वर्षांपूर्वी या कंपनीने 1 लाख डॉलर मूल्याच्या संपत्तीची माहिती दिली होती. 8 / 8गतिकचा भांडूपच्या नेप्च्यून मॉलमध्ये बुएना विस्टा शिपिंगसोबत पत्ता आहे. बुएना विस्टाने आपले कार्यालय तिथून आधीच हलविलेले आहे. त्याचे आता पवईला कार्यालय आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये गतिकचे संबंध रशियाच्या रोसनेफ्ट (Rosneft) या तेल कंपनीशी असल्याचे सांगितले जात आहे.