शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PM Yuva 2.0 Yojana: मोदी सरकारच्या 'या' योजनेत दर महिन्याला मिळतील 50 हजार रुपये, असा करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 10:30 AM

1 / 7
आपल्याला लिखानाची आवड असेल तर मोदी सरकार आपल्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहे. होय, केंद्रातील मोदी सरकारने तरुणांसाठी 'पीएम युवा 2.0 योजना' (PM Yuva 2.0 Yojana) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत तरुण लेखकांना विविध विषयांवर लेखनाची संधी दिली जात आहे.
2 / 7
मेंटॉरशिप योजनेंतर्गत तरुणांना ही संधी दिली जात आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुण लेखकांना शिष्यवृत्ती म्हणून दरमहा 50 हजार रुपये दिले जातील.
3 / 7
या तरुणांना घेता येईल भाग - यो योजनेंतर्गत 30 वर्षांपर्यंतच्या तरुणांना भाग घेता येईल. यासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 15 जारेवारी आहे. भारतीय भाषा आणि इंग्रजीमध्ये तरुणांचा सहभाग पाहता केंद्र सरकारकडून या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे.
4 / 7
या योजनेच्या पहिल्या भागात जबरदस्त र‍िस्‍पान्स मिळाला होता. दाशात देशात लेखन-वाचन आणि पुस्तक संस्कृतीचा प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने ही योजना सुरू करण्याता आली आहे.
5 / 7
75 लेखकांची निवड करण्यात येणार - या योजनेंतर्गत देशातील एकूण 75 लेखकांची नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडियाकडून (NBT) निवड करण्यात येणार आहे. मेंटरशिप योजनेत प्रशिक्षण तसेच मार्गदर्शनांच्या शेवटी सहा महिने शिष्यवृत्तीच्या स्वरुपात दर महिन्याला 50,000 रुपये (एकूण 3 लाख रुपये) प्रत्येक युवा लेखकाला दिले जातील.
6 / 7
या भाषांमध्येकरता येईल अर्ज - 22 भाषांमधील तरून 'पीएम युवा 2.0 योजनेत' भाग घेऊ शकतात. या भाषांमध्य इंग्रजी, हिंदी, उर्दू, असमिया, बांगला, गुजराती, कन्नड, कश्मीरी, कोंकणी, मलयालम, मणिपुरी, मराठी, नेपाली, उडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिल, तेलुगु, बोडो, संथाली, मैथिली और डोगरी भाषांचा समावेश आहे.
7 / 7
असा करा अर्ज - सर्वप्रथम https://innovateindia.mygov.in/yuva/ या वेबसाइटवर जा. येथे डाव्या बाजूला आपल्याला 'क्लिक हेअर टू सब्मिट' असे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. वेबसाइटवर पीएम युवा 2.0 योजनेशी संबंधित संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. आपण येथे ऑनलाईन अर्ज करून सब्‍म‍िट करू शकतो.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीStudentविद्यार्थीBJPभाजपा