शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१० रूपये प्रति शेअर दरानं सरकार घेणार व्होडाफान-आयडियामधील हिस्सा, पाहा संपूर्ण प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 9:24 PM

1 / 5
कर्जाच्या बोज्याखाली असलेली दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेड (VIL) मधील सरकारच्या हिस्स्याच्या अधिग्रहणाबाबत नवीन अपडेट समोर आले आहे. शेअरची किंमत 10 रुपयांवर स्थिर झाल्यानंतर सरकार या कंपनीतील भागभांडवल विकत घेणार असल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्याने दिली.
2 / 5
“बाजार नियामक सेबीच्या निकषांनुसार, अधिग्रहण हे समान मूल्यांवरच व्हायला हवं. व्होडाफोन आयडियाच्या शेअरचा दर 10 रूपयांच्या जवळपास स्थिर झाल्यानंतर दूरसंचार विभाग हिस्स्याच्या अधिग्रहणासाठी मंजुरी देईल,” असं सूत्रांकडून सांगण्यात आलं.
3 / 5
Vodafone-Idea चे शेअर्स 19 ऑगस्टपासून 10 रुपयांच्या खाली व्यवहार करत आहेत. गुरुवारी, कंपनीचे शेअर बीएसईवर 1.02 टक्क्यांनी घसरून 9.68 रुपयांवर बंद झाले.
4 / 5
कंपनीचे सरकारवर सुमारे 16,000 कोटी रुपयांचे व्याज दायित्व आहे. या दायित्वाच्या बदल्यात कंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये प्रति शेअरच्या समान दरावर हिस्सा देण्याची ऑफर दिली आहे. जुलैमध्ये वित्त मंत्रालयाने कंपनीतील भागभांडवल घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
5 / 5
या हिस्स्याच्या अधिग्रहणानंतर, व्होडाफोन-आयडियामधील सरकारची मालकी जवळपास 33 टक्क्यांवर येईल, तर कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा 74.99 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत खाली येईल. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत एकूण 1,94,780 कोटी रुपयांचे कर्ज होते. एप्रिल-जून 2022 च्या तिमाहीअखेर हे कर्ज 1,99,080 कोटी रुपये झाले.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारVodafoneव्होडाफोनIdeaआयडिया