national pension scheme online exit process nps new rules for government employees pfrda
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता NPS मधून होता येणार ऑनलाइन एक्झिट! By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 6:54 PM1 / 10National Pension Scheme New Rules:पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत नॅशनल पेन्शन योजनेतून ऑनलाइन आणि पेपरलेस एक्झिटची सुविधा दिली आहे. 2 / 10आता त्यांना पेन्शन योजनेतून बाहेर पडण्यासाठी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. यासाठी, आता ते ऑनलाइन आणि पेपरलेस एक्झिटची पद्धत स्वीकारू शकतात. यापूर्वी केवळ खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ही सुविधा होती. 3 / 10पीएफआरडीएने सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यासाठी ऑनलाइन एक्झिटची व्याप्ती वाढवली आहे. पीएफआरडीएच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांची सोय पाहता ऑनलाईन एक्झिट सुविधा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाइन एक्झिट त्वरित बँक खाते पडताळणीसह जोडले जाईल.4 / 10आतापर्यंत हे काम फिजिकली केले जात होते. यासाठी कर्मचाऱ्याला अनेक प्रकारची कागदपत्रे तयार करावी लागली होती आणि अनेक वेळा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. आता कर्मचारी NPS मधून पैसे काढण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी किंवा OTP द्वारे त्यांची कागदपत्रे ऑनलाइन सादर करू शकतात आणि ऑनलाइन पैसे काढू शकतात.5 / 10नॅशनल पेन्शन योजनेत समाविष्ट असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन एक्झिट होण्याची सुविधा उपलब्ध असेल. जर कोणत्याही कर्मचाऱ्याला ऑनलाईन एक्झिट होण्याच्या प्रक्रियेत समस्या येत असेल तर सरकारी क्षेत्रातील नोडल अधिकारी त्याबद्दल मार्गदर्शन करतील.6 / 10पीएफआरडीएचे म्हणणे आहे की, ऑनलाईन एक्झिट सुविधेमुळे, जेथे कर्मचारी कागदपत्रे गोळा करणे आणि सबमिट करणे यासारख्या त्रासातून मुक्त होतील, वेळ आणि पैशाची बचत होईल.7 / 10ऑनलाईन पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्याला सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी अर्थात सीआरए कडे (CRA) पैसे काढण्यासाठी अर्ज करावा लागतो. हा अर्ज ऑनलाईन देखील करता येतो. या संपूर्ण प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्याला 125 रुपये ते 500 रुपये शुल्क भरावे लागेल.8 / 10दरम्यान, नॅशनल पेन्शन योजनेत (एनपीएस) गुंतवणुकीच्या ठराविक वेळेनंतर, तुम्ही अत्यंत महत्वाच्या गरजांसाठी तुमची गुंतवणूक काढून घेऊ शकता. यामध्ये कोणत्याही गंभीर आजार, लग्न, मुलांचे लग्न, मुलांचे शिक्षण, घर बांधणे किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे यासारख्या गरजा समाविष्ट आहेत. 9 / 10या प्रकारच्या गरजेसाठी तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या 25 टक्के रक्कम काढू शकता. तुम्ही तुमच्या नॅशनल पेन्शन योजनेच्या खात्यातून 25 टक्के कालावधीत तीन वेळा पैसे काढू शकता. या तीन वेळच्या काढण्यात 5-5 वर्षांचे अंतर असावे लागते. 10 / 10जर तुम्ही सेवानिवृत्त असाल, तर तुम्हाला मॅच्योर्ड रकमेच्या 40 टक्के वार्षिकी खरेदी करावी लागेल, ज्याच्या विरूद्ध तुम्हाला पेन्शन देण्यात येईल. तुम्ही उर्वरित रक्कम एकरकमी काढू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications