national pension system withdrawal timelines shortened
NPS च्या नियमात पुन्हा मोठा बदल, पैसे जमा करण्यापूर्वी जाणून घेणे आवश्यक! By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 11:45 AM1 / 8जर तुम्हीही नॅशनल पेन्शन स्कीममध्ये (NPS) गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सरकारच्या या स्कीममध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे. ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी पीएफआरडीएने (PFRDA) हे बदल केले आहेत.2 / 8पीएफआरडीएने एनपीएसकडून अंतिम पेमेंट घेण्याची वेळ मर्यादा कमी केली आहे. पीएफआरडीच्या वतीने पेन्शन फंड्स कस्टोडियनने एनपीएसच्या सिस्टम इंटरफेसमध्ये बदल केले आहेत. या अंतर्गत, विविध व्यवहारांची वेळ मर्यादा कमी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षमता वाढवली आहे.3 / 8या बदलांतर्गत, ग्राहकांच्या पैसे काढण्याच्या विनंत्या टी+4 ऐवजी टी+2 दिवसांत केल्या जातील. येथे टी म्हणजे शेअरहोल्डरने विनंती केलेला दिवस. म्हणजेच विनंती केल्यानंतर दोन दिवस आणखी म्हणजे एकूण 3 दिवस लागतील. यापूर्वी हे काम पाच दिवसांत होत होते.4 / 8नवीन व्यवस्थेंतर्गत सीआरएशी संबंधित विनंत्या सकाळी 10:30 पर्यंत टी+2 आधारावर उरकल्या जातील. त्याचवेळी केफिन टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि सीएएमएस सीआरएशी संबंधित भागधारकांकडून सकाळी 11 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या विनंत्या टी+2 च्या आधारावर निकाली काढल्या जातील. याआधीही एनपीएसशी संबंधित नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.5 / 8एनपीएसच्या ई-नामांकन प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. हा नवा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. या अंतर्गत, नोडल अधिकारी ई-नामांकनासाठी अर्ज स्वीकारू किंवा नाकारू शकतो. नोडल ऑफिसरने अर्ज केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत ई-नामांकनावर निर्णय न घेतल्यास, केंद्रीय रेकॉर्ड कीपिंग सिस्टमद्वारे विनंती स्वीकारली जाईल.6 / 8यापूर्वी एनपीएसच्या सदस्यांना अंतिम मुदत पूर्ण झाल्यावर एक्झिट फॉर्म भरणे आवश्यक होते. यासोबतच आयुर्विमा कंपनीमध्ये अॅन्युइटी प्लॅन घेण्यासाठी फॉर्म भरणेही आवश्यक होते. पण आता अॅन्युइटी योजनेसाठी फक्त एक्झिट फॉर्मद्वारे अर्ज करता येईल. त्यामुळे आता फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही.7 / 8एनपीएस पेन्शनधारक आता डिजिटल लाइफ सर्टिफिकेट देखील जमा करू शकतील. ते आधार व्हेरिफिकेशनवर अवलंबून असणार आहे. हे काम फेसआरडी अॅपद्वारे केले जाऊ शकते, ज्यामध्ये मोबाइलमध्ये अॅप डाउनलोड करून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट बनवले जाऊ शकते.8 / 8टियर-2 शहरातील खातेदार यापुढे क्रेडिट कार्डद्वारे एनपीएस खात्यात पैसे जमा करू शकणार नाहीत. हा नियम गेल्या महिन्यातच लागू करण्यात आला आहे. मात्र, टियर-1 शहरातील खातेदार क्रेडिट कार्डद्वारे खात्यात पैसे जमा करू शकतात. आणखी वाचा Subscribe to Notifications