शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

NDTV चे शेअर्स १४ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर, अदानींच्या वृत्तानंतर गुंतवणूकदारांचे ‘अच्छे दिन’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 2:02 PM

1 / 7
Adani Group : गौतम अदानी समूहाने (Gautam Adani Group) मंगळवारी न्यू डेल्ही टेलिव्हिजन (NDTV) हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली. त्यानंतर बुधवारी टीव्ही ब्रॉडकास्टींग आणि सॉफ्टवेअर प्रोडक्शन कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांनी वाढले. एनटीव्हीच्या शेअर्सना बुधवारी अपर सर्किट लागलं आणि ते ३८४.५० रूपयांच्या स्तरावर पोहोचले. ही या शेअरची १४ वर्षांतील उच्चांकी पातळी आहे.
2 / 7
एडीटीव्हीचा शेअर २००८ नंतर आपल्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये एनडीटीव्हीच्या शेअरनं १४० टक्क्यांचे जबरदस्त रिटर्न दिले आहेत. तर दुसरीकडे गेल्या वर्षभरात या शेअरच्या किंमतीत ३९२.९५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
3 / 7
अदानी समुहाची कंपनी एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेडनं (AMNL) इनडायरेक्ट पद्धतीनं एनडीटीव्हीमध्ये 29.18 टक्के हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी समूह एनटीव्हीमध्ये हिस्सा खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर सादर करणार आहे.
4 / 7
AMG Media Networks Limited (AMNL) ची पूर्ण मालकीची उपकंपनी, विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VPCL) मार्फत हे अधिग्रहण केले जाईल. AMG Media Networks Limited (AMNL) ही अदानी एंटरप्रायझेसच्या मालकीची कंपनी आहे.
5 / 7
यासंदर्भात अदानी समुहाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार VCPL कडे RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडचा 99.5 टक्के हिस्सा खरेदी करण्याचा अधिकार होता. VCPL नं याच अधिकारानुसार स्टेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिडेटची प्रमोटर ग्रुप कंपनी आहे. मीडिया कंपनी एनडीटीव्हीमध्ये त्यांचा 29.18 टक्के हिस्सा आहे. तोच अदानी समूहाकडून खरेदी करण्यात येणार आहे. 
6 / 7
एनडीटीव्हीच्या संस्थापकांच्या माहिती किंवा सहमतीशिवाय या अधिकार अथवा वॉरंट्सचा वापर केला गेला आहे, व्हीपीसीएलनं २००९-१० मध्ये एनडीटीव्हीचे संस्थापक राधिका आणि प्रणय रॉय यांच्यासोबत एक करार केला होता आणि ही नोटीस याच आधारावर पाठवण्यात आली आहे.
7 / 7
व्हिसीपीएलन १० रूपये प्रति शेअरवर १९,९०,००० वॉरंट्स RRPRH च्या इक्विटी शेअर्समध्ये बदलण्याच्या आपल्या अधिकाराचा वापर केला आहे आणि एकूण १.९९ कोटी रूपये RRPRH ला ट्रान्सफर केल्याचं नोटिसमध्ये सांगितलं आहे, असं एनडीटीव्हीनं शेअर बाजाराला पाठवलेल्या सूचनेत म्हटलंय.
टॅग्स :Adaniअदानीshare marketशेअर बाजार