new gold hallmarking law modi government applicable from 1 june 2021
सोन्याच्या खरेदीसाठी मोदी सरकारनं आणला नवा नियम; 'या' दिवसापासून लागू होणार By कुणाल गवाणकर | Published: November 14, 2020 3:11 PM1 / 10सोनं खरेदी दरम्यान ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी मोदी सरकार नवे नियम लागू करणार आहे. 2 / 10मोदी सरकार पुढील वर्षापासून सोन्याच्या हॉलमार्किंगचे नवे नियम लागू करणार आहे. चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यात केंद्रानं दागिन्यांसाठी हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला.3 / 10पूर्ण देशात १ जून २०२१ पासून हॉलमार्किंग अनिवार्य असेल. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक टळेल.4 / 10पुढील वर्षापासून देशात ग्राहक संरक्षण कायदा २०१९ देखील लागू होईल. नवा कायदा सोन्यासाठीही लागू असेल.5 / 10नवा कायदा लागू झाल्यानंतर फसवणूक करणाऱ्या ज्वेलर्सवर कठोर कारवाई होईल.6 / 10२२ कॅरटचं सोनं सांगून १८ कॅरटचं सोनं विकणाऱ्या ज्वेलर्सना नवा कायदा लागू झाल्यानंतर दंड आणि तुरुंगवास होईल.7 / 10केंद्र सरकारनं याच वर्षी जानेवारीत नोटिफिकेशनमध्ये सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणं अनिवार्य असल्याचं नोटिफिकेशन जारी केलं. 8 / 10१५ जानेवारी २०२१ पासून नवा कायदा लागू होणार होता. मात्र जुलैमध्ये सरकारनं नवा कायदा लागू करण्याची तारीख बदलून १ जून २०२१ केली.9 / 10इतक्या कमी अवधीत संपूर्ण देशात हॉलमार्किंगचा नियम लागू करणं अवघड असल्याचं ज्वेलर्स असोसिएशननं म्हटलं होतं.10 / 10त्यानंतर ज्वेलर्स असोसिएशननं नियम लागू करण्यासाठीची डेडलाईन पुढे ढकलण्याची मागणी केली. ती सरकारनं मान्य केली. आणखी वाचा Subscribe to Notifications