शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

New Income Tax Slab 2023: बल्ले बल्ले! 5, 10, 15 लाख, तुमच्या उत्पन्नावर किती लागणार टॅक्स;, भरपूर पैसे वाचणार, कॅल्क्युलेशन आले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 1:46 PM

1 / 9
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज करदात्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. नव्या करप्रणालीत 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. स्लॅबची संख्या सहावरून पाचवर आणण्याची घोषणा त्यांनी केली आहे. यानुसार आता ८ लाखांपेक्षा उत्पन्न असेल तर तुम्हाला कर भरावा लागणार आहे.
2 / 9
हा कर किती असेल? तुमचा पगार, बोनस, पीएलपी आदींवर सारे अवलंबून असणार आहे. म्हणजेच आता सात लाखांच्या वर उत्पन्न असेल तर कर भरावा लागणार आहे. यामुळे यंदाची कराची घातलेली गणिते पूर्णपणे बदलणार आहेत. यासाठी तुम्हाला येत्या आर्थिक वर्षापासून गुंतवणुकीची तयारी करावी लागणार आहे.
3 / 9
सात लाखांपर्यंत उत्पन्न कर झिरो असणार आहे. यानंतर सात ते आठलाखांमधील उत्पन्नावर तुम्हाला ३५००० रुपये कर भरावा लागणार आहे. यामुळे तुम्हाला वाढलेला पगार आणि उत्पन्नाचे गणित घालून कर वाचवावा लागणार आहे. आठ लाखांमध्ये 30,000 रुपये
4 / 9
आता 9 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर केवळ 45 हजार रुपये भरावे लागतील. आताच्या कर प्रणालीमध्ये ते 85,800 रुपये रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच आता तुमचे 40,800 रुपये वाचणार आहेत.
5 / 9
15 लाख उत्पन्नावर फक्त 10 टक्के कर भरावा लागणार आहे. म्हणजेच 1.5 लाख रुपये भरावे लागणार आहेत. सध्या या उत्पन्नावर 2,57,400 रुपये कर द्यावा लागत होता. म्हणजेच 1,07,400 रुपये वाचणार आहेत.
6 / 9
15.5 लाख आणि त्यावरील कर प्रणालीमध्ये रु. 52,500 पर्यंत स्टँडर्ड वजावट देण्यात आली आहे. कमाल अधिभार दर 37 टक्क्यांवरून 25 टक्के करण्यात आला आहे.
7 / 9
१० लाख रुपयांचे उत्पन्न असेल तर तुम्हाला ६० हजार रुपये कर भरावा लागणार आहे. आधी 1,06,600 रुपये भरावे लागायचे. हेच उत्पन्न ११ लाखांवर गेले तर ७५ हजार रुपये कर भरावा लागणार आहे.
8 / 9
तुमचे उत्पन्न १२ लाख रुपये असेल तर ९० हजार रुपये कर भरावा लागणार आहे. आधी 1,63,800 रुपये भरावा लागत होते. १३ लाख असेल तर १२०००० रुपयांचा कर भरावा लागणार आहे.
9 / 9
20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 3,00,000 रुपयांचा कर भरावा लागणार आहे. आधी 4,13,400 रुपये कर होता. यामुळे 1,13,400 रुपये वाचणार आहेत.
टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2023Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन