शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पिवळ्या रंगाची 20 रुपयांची नवी नोट; जाणून घ्या काय आहे वैशिष्ट्य..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 11:40 AM

1 / 5
रिझर्व्ह बँकेकडून लवकरच बाजारात 20 रुपयांची नवीन नोट येणार आहे. ही नोट सध्या उपलब्ध असणाऱ्या नोटांपेक्षा वेगळी आहे. तसेच या नोटेच्या साइजमध्येही बदल करण्यात आले आहेत.
2 / 5
मीडिया रिपोर्टनुसार ही नोट कानपूरमधील रिझर्व्ह बँकेच्या विभागीय कार्यालयात पोहचली असून लवकरच या नोटा बँकांकडे दिले जाणार आहेत.
3 / 5
या नोटेवर आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी आहे. आरबीआयकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, जरी 20 रुपयांची नवीन नोट बाजारात आली तरी जुन्या 20 रुपयांच्या नोटा चलनात कायम राहतील.
4 / 5
नवीन येणाऱ्या 20 रुपयांच्या नोटेचा रंग पिवळा असून त्या नोटेवर देशाची संस्कृती दर्शविणारे वेरुळ लेणीचे चित्र आहे.
5 / 5
जुन्या 20 रुपयांच्या नोटेपेक्षा नवीन येणारी नोट ही साईजमध्ये छोटी आहे.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकIndian Currencyभारतीय चलन