शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PF अकाऊंटवर लवकरच जमा होणार व्याज, कसं तपासाल? फक्त एका मेसेजवर मिळेल माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 5:49 PM

1 / 9
साल २०२१ साठीचा कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा असलेल्या रमकेवरील व्याज लवकरच खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती ईपीएफओकडून देण्यात आली आहे. एका ट्विटर युझरनं ईपीएफओला विचारलेल्या प्रश्नावर संस्थेकडून उत्तर देण्यात आलं आहे.
2 / 9
ईपीएफओकडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर वार्षिक ८.५ टक्के व्याजाचा लाभ दिला जातो. जुलैच्या अखेरीस यंदाच्या वर्षाचं व्याज जमा केलं जाईल असं सांगण्यात येत होतं. पण अद्याप तसं झालेलं नाही. त्यामुळे नोकरदार वर्गाची उत्सुकता देखील ताणली गेली आहे.
3 / 9
ईपीएफओनं सुद्धा याच मुद्द्यावरुन प्रतिक्रिया दिली आहे. व्याज जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून लवकरच खात्यामध्ये अपडेट केली जाईल असं सांगितलं गेलं आहे. देशातील कोट्यवधी लोक आपल्या भविष्यासाठी पीएफ अकाऊंटवर निर्भर असतात.
4 / 9
ईपीएफओच्या अकाऊंटवर देशातील कर्मचारी वर्गाच्या पगारातील ठराविक पैसा दरमहा जमा केला जातो. यावर ईपीएफओकडून व्याज दिलं जातं.
5 / 9
पीएफ अकाऊंट असलेला प्रत्येक नोकरदार आपल्या खात्यातील जमा रकमेची माहिती अवघ्या काही सेकंदात मिळवू शकतात. एका मेसेज किंवा मिस्ड कॉलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अकाऊंटमधील जमा रकमेची माहिती मिळवू शकता.
6 / 9
तुमचा UAN नंबर ईपीएफओकडे रजिस्टर केलेला असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यातील माहिती घरबसल्या मिळू शकेल. यासाठी तुम्हाला 7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN ENG (शेवटची तीन अक्षरं तुम्हाला येणाऱ्या मेसेजच्या भाषेसंबंधीची आहेत) असा मेसेज पाठवायचा आहे.
7 / 9
तुम्हाला जर मराठी किंवा हिंदी भाषेत माहिती हवी असेल तर मराठीसाठी EPFOHO UAN MAR असा आणि हिंदीसाठी EPFOHO UAN HIN असा मेसेज पाठवावा लागेल. पीएफ खात्यातील रकमेची माहिती तुम्ही इंग्रजी, पंजाबी, मराठी, हिंदी, कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि बंगाळी भाषांमध्ये मिळवू शकता.
8 / 9
पीएफ अकाऊंटमधील जमा रकमेची माहिती मिळविण्यासाठी तुमचा UAN, बँक अकाऊंट, पॅन (PAN) आणि आधारशी (AADHAR)लिंक्ड असणं अनिवार्य आहे. याशिवाय तुम्हील ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन तुमचं पासबुक तपासू शकता. यासाठी UAN क्रमांक माहित असणं गरजेचं आहे.
9 / 9
तुम्ही तुमच्या रजिस्टर मोबाइल क्रमांकावरुन 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन माहिती मिळवू शकता. मिस्ड कॉल दिल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल. त्यात तुमच्या पीएफ अकाऊंटमधील संपूर्ण माहिती दिसेल.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीEmployeeकर्मचारीbusinessव्यवसाय