शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता बाटलीबंद पाण्याची चव बदलणार! 1 जानेवारीपासून लागू होणार नवा नियम

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 04, 2020 4:55 PM

1 / 9
आता बाटलीबंद पाण्याची चव बदलणार आहे. Food Safety Standards Authority of India (FSSAI)ने पाण्याच्या बाटल्यांसाठी नव्या गाईडलाईन्स (Guidelines) तयार केल्या आहेत. यामुळे आता सर्व पॅकेज्ड पाणी तयार करण्याची पद्धत बदलणार आहे.
2 / 9
पाण्याच्या बाटलीत एकत्र करावे लागतील मिनरल्स - इंग्रजी वेबसाईट moneycontrol.com ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, FSSAIच्या नव्या गाईडलाईननंतर पॅकेज्ड पाणी (Packaged water) तयार करणाऱ्या कंपन्यांना एक लीटर पाण्याच्या बाटलीत 20 मिलीग्रॅम (mg) कॅल्शियम आणि 10 मिलीग्रॅम मॅग्नेशियम एकत्र करावे लागेल.
3 / 9
NGTने दिला होता आदेश - मिनरल्स (Minerls) चवीसाठी अधिक चांगले असल्याचे मानले जाते. यामुळे नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (NGT)ने FSSAIला पॅकेजिंग पाण्यात काही विशेष मिनरल्स अॅड करण्याची शक्यता शोधण्यास सांगितले होते.
4 / 9
NGTने म्हटले आहे, की पाणी सुरक्षित करण्यासाठी, फिल्टरच्या प्रक्रियेत मिनरल्स काढणे आवश्यक असते. ते ग्राहकांच्या फायद्यासाठी पुन्हा टाकले जावेत.
5 / 9
31 डिसेंबर 2020 डेडलाईन निश्चित - NGT ने 29 मे 2019 रोजीच हा आदेश दिला होता. हा आदेश लागू करण्यासाठी कंपन्यांना दोन वेळा वेळ दिला होता. मात्र, आता हा आदेश लागू करण्यासाठी सरकारने 31 डिसेंबर 2020ची डेडलाईन निश्चित केली आहे.
6 / 9
सरकारने दिलेल्या या डेडलाईनमुळे आता हा नियम 1 जानेवारी 2021पासून लागू होईल.
7 / 9
यासाठी FSSAIने आधीच नव्या पद्धतीने प्रोडक्ट्स तयार करण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. तसेच यानंतर पॅकेज्ड वॉटर तयार करणाऱ्या कंपन्यांना आणखी वेळ दिला जाणार नाही, हे NGTने स्पष्ट केले आहे.
8 / 9
भारतीय बाजारात सध्या Kinley, Bailey, Aquafina, Himalayan, Rail Neer, Oxyrich, Vedica आणि Tata Water Plus हे पॅकेज्ड वाटरच्या उद्योगात आहेत. यांनी नव्या नियमा प्रमाणे पाणी तयार करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. या सर्व कंपन्या आपल्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये निर्धारित प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्र करतील.
9 / 9
भारतातील पॅकेज्ड पाण्याचा उद्योग 3000 कोटी रुपयांचा आहे. कंपनी 500 ml, 250 ml, 1 लीटर, 15-20 लीटरच्या बाटल्या विकतात. मात्र, 42 टक्के मार्केट हे 1 लीटरच्या बाटल्यांचे आहे.
टॅग्स :Waterपाणीbusinessव्यवसाय