शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

New Rules BIS Hallmark: नियम बदलले! हॉलमार्किंग नसलेले जुने सोने आहे? तुम्हाला असे दागिने विकता येतात का? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 10:19 AM

1 / 9
भारतात सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. विशेषतः सणासुदीच्या काळात, शुभ मुहुर्तांवर सोने खरेदीची मोठी परंपरा आपल्याकडे दिसते. देशातील मोठी लोकसंख्या आपल्या कष्टाने कमावलेले पैसे जोडून सोन्याचे दागिने खरेदी करते. अशा परिस्थितीत त्यांनी कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये, यासाठी सरकारने हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. (New Rules BIS Hallmark)
2 / 9
BISने सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग आता बंधनकारक केले आहे. त्यामुळे तुम्ही सणासुदीच्या काळात सोने खरेदी करत असाल तर दागिन्यांवर हॉलमार्क आहे की नाही हे तपासून घ्या. BIS च्या हॉलमार्किंगअंतर्गत सोनारांना हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी नोंदणी क्रमांक दिला जातो. (New Rules Gold Hallmark)
3 / 9
तसेच जर तुम्ही घरात ठेवलेले जुने सोन्याचे दागिने स्वच्छ करून पॉलिश करून घेणार असाल तर त्यांवर हॉलमार्क केले जाऊ शकते. जुन्या दागिन्यांवरच हॉलमार्किंग मार्क मिळवायचे असेल तर हे कामही करता येईल. हॉलमार्किंग फक्त सोनारांसाठी अनिवार्य आहे.
4 / 9
तुमच्याकडे जुने दागिने असून त्यावर हॉलमार्किंगचे चिन्ह नसले तरीही सोनार असे सोने खरेदी करू शकतात. ग्राहक त्यांच्या जुन्या दागिन्यांचे हॉलमार्क त्यांच्या ज्वेलर्सद्वारे करून घेऊ शकतात. यासाठी त्यांना ठराविक शुल्क भरावे लागते. सोन्याच्या हॉलमार्किंगचे नियम फक्त ज्वेलर्ससाठी आहेत. दरम्यान सोनार ग्राहकांना हॉलमार्किंग नसलेले सोन्याचे दागिने विकू शकत नाहीत.
5 / 9
तसेच जर ग्राहकाकडे आधीपासून हॉलमार्क नसलेले दागिने असतील तर त्यावर परिणाम होणार नाही आणि पूर्वीप्रमाणेच विक्री करता येईल. एखाद्या ज्वेलर्सने ग्राहकाकडून सोने खरेदी करण्यास किंवा देवाणघेवाण करण्यास नकार दिल्यास त्याच्यावरही कारवाई होऊ शकते.
6 / 9
सरकारी आकडेवारीनुसार १ एप्रिल २०२२ ते ३१ जुलै २०२२ पर्यंत सुमारे ३.७ कोटी दागिने हॉलमार्क करण्यात आले आहेत. त्याचवेळी, २०२१-२२ मध्ये एकूण ८.६८ कोटी दागिने हॉलमार्क केले गेले.
7 / 9
एखादा ग्राहक हॉलमार्क असूनही सोन्याच्या शुद्धतेबद्दल असमाधानी असेल, तर तो हॉलमार्किंग केंद्रावर स्वतःहून सोन्याची तपासणी करून घेऊ शकतो. मात्र, ग्राहकाचे आव्हान खरे असल्याचे सिद्ध झाल्यास सोनारावर कारवाई करण्याची तरतूद आहे.
8 / 9
यासोबतच ग्राहकांना भरपाईही दिली जाईल. त्यासाठी देशभरातील शहरांमध्ये हॉलमार्किंग केंद्रेही उघडली जात आहेत. हॉलमार्क अनिवार्य करण्याचा पहिला टप्पा २३ जून २०२१ पासून लागू झाला. हॉलमार्क केंद्र असलेल्या २५६ जिल्ह्यांमध्ये या नियमानुसार हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे.
9 / 9
त्यांनतर दुसरा टप्पा १ जून २०२२ पासून लागू झाला. दुसऱ्या टप्प्यात अनिवार्य हॉलमार्क प्रणाली अंतर्गत ३२ अतिरिक्त जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. दागिने खरेदी करताना योग्य पद्धतीने हॉलमार्क केले आहे ना. हॉलमार्कचे सर्व नियम पाळले गेले आहेत ना, याची खात्री केल्यानंतरच सोने किंवा दागिने खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे.
टॅग्स :Goldसोनं