शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१ सप्टेंबरपासून होणार 'हे' सात बदल, शेतकऱ्यांपासून सामान्यांवर होणार मोठे परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 12:59 PM

1 / 9
दोन दिवसांनी नवीन महिना म्हणजेच सप्टेंबर सुरू होणार आहे. महिन्याच्या पहिल्याच तारखेपासून म्हणजे १ सप्टेंबरपासून अनेक बदल होणार आहेत. बँकिंगच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. तसेच, एलपीजी (LPG) च्या किमतींमध्ये बदल होऊ शकतो. नवीन महिना सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान योजनेशी संबंधित कामांचा निपटारा करणेही आवश्यक आहे. असे अनेक बदल आहेत, जे १ सप्टेंबरपासून होणार आहेत. तुमचे एखादे महत्त्वाचे काम आतापर्यंत पूर्ण झाले नसेल, तर ते त्वरित पूर्ण करा.
2 / 9
पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना बऱ्याच काळापासून KYC अपडेट करण्यास सांगत आहे. केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट असल्याचे बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व ग्राहकांनी केवायसी अपडेट करणे आवश्यक असल्याचे बँकेने ट्वीटद्वारे सांगितले होते. हे काम पूर्ण करण्यासाठी बँकेने 31 ऑगस्ट 2022 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे.
3 / 9
बँकेच्या म्हणण्यानुसार, जर तुमचे खाते 31 मार्च 2022 पर्यंत KYC अपडेट केले नसेल तर ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करा. केवायसी अपडेट करण्यासाठी, तुमच्या मूळ शाखेशी संपर्क साधा. जर तुम्ही KYC अपडेट केले नसेल, तर तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही.
4 / 9
पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत बदल करतात. अशा परिस्थितीत एलपीजीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. वाढलेल्या किमतीपासून दिलासा हवा असेल तर आजच तुमचा एलपीजी सिलिंडर बुक करा, आजच बुक केल्यास तुम्हाला नवीन दरातून पैसे द्यावे लागणार नाहीत.
5 / 9
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांसाठी ई-केवायसीची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे. शेतकऱ्यांनी हे काम 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण न केल्यास त्यांचा पुढील हप्ता अडकून पडू शकतो.
6 / 9
दिल्लीला जाण्यासाठी यमुना एक्सप्रेसवेचा वापर करणाऱ्यांना 1 सप्टेंबरपासून अधिक टोल टॅक्स भरावा लागणार आहे. नवीन भाडेवाढीनुसार, कार, जीप, व्हॅन आणि हलकी मोटार वाहनांसाठी टोल दर प्रति किमी 2.50 रुपये वरून 2.65 किमी करण्यात आला आहे. प्रति किलोमीटर 15 पैशांची वाढ झाली आहे. हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहू वाहने किंवा मिनीबससाठी टोल टॅक्स 3.90 रुपये प्रति किमीवरून 4.15 रुपये प्रति किमी करण्यात आला आहे. बस किंवा ट्रकचा टोल दर 7.90 रुपये प्रति किमीवरून 8.45 रुपये प्रति किमी करण्यात आला आहे. यापूर्वी 2021 मध्ये यमुना एक्सप्रेस वेच्या टोल टॅक्समध्ये वाढ करण्यात आली होती.
7 / 9
IRDAI ने सामान्य विम्याचे नियम बदलले आहेत. आता विमा एजंटला 30 ते 35 टक्क्यांऐवजी केवळ 20 टक्के कमिशन मिळणार आहे. यामुळे लोकांच्या प्रीमियमची रक्कम कमी होईल.
8 / 9
जर तुम्ही सप्टेंबर महिन्यात ऑडी कार घेण्याचा विचार करत असाल तर ही कार महाग होणार आहे. ऑडी कारच्या किमती 2.5 टक्क्यांनी वाढणार आहेत. नवीन दर 20 सप्टेंबरपासून लागू होतील.
9 / 9
जर तुम्ही गाझियाबादमध्ये मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 1 सप्टेंबरपेक्षा जास्त खर्च करावा लागेल. गाझियाबादमधील सर्कल रेटमध्ये 2 ते 4 टक्के वाढ होणार आहे.
टॅग्स :businessव्यवसाय