शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

New TDS Rules: पुढील महिन्यापासून TDS नियम बदलणार; ५० पटींनी दंड, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 12:40 PM

1 / 10
New TDS Rules: फायनान्स अॅक्ट २०२१ लागू होणार आहे. यानंतर टीडीएसमध्ये काही बदल (TDS Rules Changing From 1st July) होणार आहेत. हे बदल येत्या १ जुलैपासून लागू होतील. हे बदल नवीन साहित्या खरेदी (TDS Rules for goods purchase) आणि आयटीआर फाईल (TDS Rules for non itr filers) न करणाऱ्यांसंबंधी आहे. यामध्ये जबर दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
2 / 10
नुकताच सेक्शन 194Q जोडण्यात आले आहे. हे सेक्शन सामान खरेदी करण्याच्या आधीच ठरलेल्या किंमतीवर लागणाऱ्या टीडीएसशी संबंधित आहे. यानुसार ५० लाख रुपयांपेक्षा अधिकच्या व्यावसायिक खरेदीवर ०.१० टक्के टीडीएस लावला जाणार आहे.
3 / 10
गेल्या वर्षी एखाद्या व्यावसायिकाचा टर्नओव्हर १० कोटी रुपयांहून अधिक झाला असेल तर आणि जर तो यंदा ५० लाखांहून अधिक माल खरेदी करलत असेल तर त्याला ५० लाखांच्यावर जेवढी विक्री होईल त्यावर हा टीडीएस द्यावा लागणार आहे.
4 / 10
१ जुलैपासून 206एबी सेक्शन देखील लागू होणार आहे. यानुसार विक्रेत्याने जर दोन वर्षांपासून आयकर भरला नसेल तर त्याला हा टीडीएस ५ टक्के भरावा लागणार आहे. म्हणजेच जो टीडीएस ०.१० टक्के होता तो ५० पटींनी वाढणार आहे.
5 / 10
जर गेल्य़ा वर्षी टीसीएस (टॅक्स कलेक्टेड एट सोर्स) 50 हजार रुपयांहून जास्त असेल तरी देखील टीडीएस कपात ५ टक्क्यांची केली जाणार आहे.
6 / 10
जर तुम्ही आधार-पॅन लिंक करायला विसरला असाल तर ही शेवटची संधी आहे. ३० जूनला शेवटची तारीख देण्यात आली आहे. यानंतर १ जुलैपासून मोठा दंड केला जाणार आहे.
7 / 10
आधार व पॅन ही दोन्ही कार्डे आता प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचे घटक ठरू लागले आहेत. अनेकदा आर्थिक व्यवहारांसाठी या दोन्हीपैकी एका कार्डाची अनिवार्यता असते. प्राप्तिकराचे विवरणपत्र भरण्यासाठी तर पॅन क्रमांक असणे सक्तीचे करण्यात आले आहे.
8 / 10
आधार कार्डवर जसे नाव असेल त्याच क्रमाने ‘लिंक आधार’वर नाव नमूद करा. जन्मतारीख, पत्ता इत्यादी आवश्यक सर्व रकाने काळजीपूर्वक भरा. सगळ्यात शेवटी कॅपचा कोड एन्टर करा, असे लिहिले असेल. हा कॅपचा कोडही नीट पाहून नमूद करा
9 / 10
आधार आणि पॅन कार्ड संलग्न करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. दोन्ही कार्ड संलग्न न केल्यास १ हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे
10 / 10
www.incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर त्यावर तुमचा पॅन कार्डाचा आणि आधार कार्डाचा क्रमांक त्यावर नमूद करा
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स