शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कर्मचाऱ्यांना दिलासा! आठवड्याला मिळणार ३ दिवस सुट्टी, अन्...; केंद्र सरकारची संपूर्ण तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 8:48 PM

1 / 11
केंद्र सरकार नवीन व्हेज कोड बिल आणण्याची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. ऑक्टोबरपासून New Wage Code India लागू केलं जाऊ शकतं. यापूर्वीच १ एप्रिलला हे विधेयक लागू करण्यात येणार होते. परंतु राज्य सरकारकडून ड्राफ्ट रुल्स न मिळाल्यानं हे नियम लागू होऊ शकले नाहीत.
2 / 11
या नव्या नियमातंर्गत कर्मचाऱ्यांना सुट्टी, पगार आणि काम करण्याचे तास यामध्ये अनेक बदल करण्यात येणार आहेत. म्हणजे या नव्या विधेयकानुसार, कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नेमकं यात काय नवीन आहे जाणून घेऊया
3 / 11
नवीन व्हेज कोडनुसार कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास ९ तासांऐवजी १२ तास करण्यात आले आहेत. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या मते, आठवड्यातून ४८ तास कामकाज करण्याचा नियम लागू राहणार आहे. काही कर्मचारी संघटनांनी १२ तास काम आणि ३ दिवस सुट्टी नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
4 / 11
सरकारने सांगितले आहे की, आठवड्याचे ४८ तास काम करण्याचा नियम राहील. जर कुणी दिवसाला ८ तास काम करत असेल तर त्याला आठवड्याला ६ दिवस काम करायला लागेल. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला आठवड्याची एक सुट्टी दिली जाईल.
5 / 11
जर कुणी दिवसाला १२ तास काम करत असेल तर त्याला आठवड्याला ३ दिवस सुट्टी द्यावी लागेल. नवीन व्हेज कोडमध्ये अनेक तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे ऑफिसमध्ये काम करणारे, कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे.
6 / 11
कर्मचाऱ्यांच्या सॅलरीपासून त्यांच्या सुट्ट्यांपर्यत आणि कामाच्या तासाबद्दल नवीन नियम बदलले जातील. नव्या व्हेज कोडनुसार काही तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे कर्मचाऱ्याच्या आयुष्यात अनेक बदल घडतील. कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्क्ट्रक्चरमध्येही बदल होईल.
7 / 11
Take Home Salary कमी केली जाऊ शकते कारण नव्या व्हेज कोड एक्टनुसार कुठल्याही कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी कंपनीच्या CTC च्या तुलनेत ५० पेक्षा कमी असू शकत नाही. आता अनेक कंपन्या बेसिक सॅलरी कमी करून कर्मचाऱ्यांना भत्ते देण्यावर भर देत आहेत.
8 / 11
कर्मचाऱ्यांच्या भरपगारी सुट्ट्या २४० वरून ३०० करण्यात येणार आहेत. लेबर कोड नियमानुसार, अनेक तरतुदींवर कामगार मंत्रालयाकडून चर्चा करण्यात आली आहे. ज्यात कर्मचाऱ्यांना Earned Leave २४० हून वाढवून ३०० करण्याची मागणी केली होती.
9 / 11
पहिल्यांदाच देशात सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना मिनिमम वेज म्हणजे तुम्हाला किमान वेतन मिळेल. स्थलांतरित मजुरांसाठी नवीन योजना आणल्या जात आहेत. याशिवाय सर्व कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी भविष्य निर्वाह निधीची सुविधा दिली जाईल. संघटित आणि असंघटित क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांनाही ईएसआयचे संरक्षण मिळेल.
10 / 11
याअंतर्गत महिलांना सर्व प्रकारच्या व्यवसायात काम करण्याची परवानगी दिली जाईल, त्यांना रात्रीच्या शिफ्ट करण्याचीही परवानगी असेल. या अंतर्गत मूलभूत वेतन वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पीएफ अधिक कापला जाईल, म्हणजेच तुमचे भविष्य पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित असेल.
11 / 11
पीएफ सोबतच ग्रॅच्युइटी मध्ये योगदान देखील वाढेल. म्हणजेच, टेक होम पगार नक्कीच कमी होईल परंतु कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर अधिक रक्कम मिळेल. असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही नवीन वेतन संहिता लागू होईल. वेतन आणि बोनस संबंधित नियम बदलतील आणि प्रत्येक उद्योग आणि क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये समानता असेल.
टॅग्स :Employeeकर्मचारीCentral Governmentकेंद्र सरकार