शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

New Year 2022 : १ जानेवारीपासून अनेक गोष्टी महाग होणार, खिशावरील भार वाढणार; जाणून घ्या, सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 12:45 PM

1 / 7
नवीन वर्ष 2022 सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. नवीन वर्षात काय करायचे याचे संकल्पही अनेकांनी केले असतील. मात्र, असे असले तरी खिशावरील भार वाढणार आहे, हेही लक्षात असायला हवे. कारण १ जानेवारीपासून अनेक गोष्टी महाग होणार आहेत.
2 / 7
१ जानेवारीपासून कपडे आणि फूटवेअरवर १२ टक्के जीएसटी लागू केला जाणार आहे. याआधी रेडीमेड कपडे आणि फूटवेअरवर ५ टक्केच जीएसटी आकारला जात होता. याशिवाय, ओला वा उबर या ॲपवरून रिक्षा बुक केल्यास त्यावरही ५ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे.
3 / 7
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (आयपीपीबी) खातेधारकांना १ जानेवारीपासून मर्यादित प्रमाणात रोकड काढणे आणि डिपॉझिट करण्यावर शुल्क द्यावे लागेल.बचत खात्यावर दरमहा ४ कॅश विथड्रॉवल मोफत असेल. त्यानंतर प्रत्येक विथड्रॉवलवर ०.५० टक्के शुल्क आकारले जाईल. हे शुल्क कमीतकमी २५ रुपये एवढे असेल. बचत खात्यात पैसे जमा करण्यावर शुल्क आकारले जाणार नाही. १० हजारावरील रक्कम डिपॉझिट केल्यास त्यावर मात्र ०.५० टक्के शुल्क आकारले जाईल, जे २५ कमीतकमी २५ रुपये असेल.
4 / 7
केंद्र सरकारने आता १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला मान्यता दिली आहे. ३ जानेवारीपासून लसीकरण अभियान सुरू होणार आहे. तत्पूर्वी १ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरणासाठी कोविन ॲपवर रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. तसेच, शालेय तसेच महाविद्यालयीन ओळखपत्र त्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे.
5 / 7
ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर १ जानेवारीपासून क्रिकेटचे सामने पाहता येणार आहेत. तसेच, एटीएम व्यवहारांवर शुल्क आकारणी केली जाणार आहे. याशिवाय, १ जानेवारीपासून ओला आणि उबेरद्वारे ऑटो किंवा कॅब बुकिंग महाग होणार आहे.
6 / 7
मारुती सुझुकी, रेनॉ, होंडा, टोयोटा आणि स्कोडासह बहुतांश गाड्या महाग होणार आहेत. १ जानेवारीपासून या गाड्यांच्या किमतींमध्ये २.५ टक्के वाढ होणार आहे.
7 / 7
कॅन्सरवरील औषधे, फोर्टिफाइड तांदूळ आणि बायोडिझेलवरील जीएसटी दर आधीच्या १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.
टॅग्स :businessव्यवसायNew Yearनववर्ष