NHAI removes requirement of maintaining minimum amount in FASTag wallet
FASTag वॉलेटमध्ये किमान बॅलन्स ठेवण्याचं बंधन नाही; आता 'अशी' देता येईल टोलची रक्कम By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 9:07 PM1 / 15FASTag वॉलेटमध्ये आता किमान बॅलन्स ठेवण्याचं बंधन काढून टाकण्यात आलं आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं बुधवारी याबाबत माहिती देत FASTag वॉलेटमध्ये किमान बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं. 2 / 15टोल नाक्यांवर वाहनांची गर्दी न होता वाहनांना सहजरित्या ये जा करता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 3 / 15यापूर्वी कार/जीप/वॅनसाठी FASTag वॉलेटमध्ये सिक्युरिटी डिपॉझिटसह किमान रक्कम ठेवणं अनिवार्य करण्यात आलं होतं. 4 / 15तसंच FASTag वॉलेटमध्ये किमान रक्कम नसल्यास चालकांना टोल नाक्यांवरून जाण्याची परवानगी नव्हती. हायवे अथॉरिटीच्या या निर्णयानंतर आता प्रवासी वाहतुकीच्या गाड्यांना याचा फायदा मिळणार आहे.5 / 15जर वाहनचालकाच्या FASTag वॉलेटमध्ये थोडी रक्कम असेल आणि वाहन टोल नाका पार केल्यानंतर ती रक्कम मायनसमध्ये गेली तर त्याच्या सिक्युरिटी डिपॉझिटमधून ती रक्कम कमी केली जाईल. 6 / 15जेवढी रक्कम त्यातून कमी होईल तेवढी पुढच्या वेळी वॉलेटमध्ये भरताना कमी करून उर्वरित रक्कम भरली जाईल. 7 / 15सध्या देशात २.५४ कोटींपेक्षा अधिक FASTag युझर्स आहेत. याव्यतिरिक्त टोल नाक्यांवरून मिळणाऱ्या रकमेपैकी ८० टक्के रक्कम ही FASTag द्वारे मिळते. 8 / 15FASTag द्वारे दररोज ८९ कोटी रूपयांपेक्षा अधिक टोल मिळत आहे. १५ फेब्रुवारीपासून प्रत्येक टोल नाक्यांवर FASTag द्वारेच टोल वसूली करण्यात येणार आहे. 9 / 15आता FASTag वापरणे सर्वच वाहनांना बंधनकारक करण्यात आले आहे. ही एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी आहे. FASTag सेव्हिंग अकाऊंट किंवा डिजिटल वॉलेटला जोडता येते.10 / 15फास्टॅग टोल नाक्यांवर, बँकांच्या वेबसाईटवर, वेगवेगळ्या पीओएस आणि ई कॉमर्स वेबसाईटवरूनही खरेदी करता येतो. गुगल प्ले स्टोअरवर My FASTag अॅप डाऊनलोड करता येते. यावरूनही फास्टॅग खरेदी करता येऊ शकतो.11 / 15FASTag खरेदी करताना कागदपत्रांची गरज लागणार आहे. यामध्ये वाहनाचे आरसी बुक, मालकाचा फोटो, आयडी प्रूफ, अॅड्रेस प्रूफ आदी कागदपत्रे द्यावी लागतात.12 / 15हो टोल प्लाझावर फास्टॅग खरेदी करता येतो. टोल प्लाझावर दोन्ही बाजुला फास्टॅग विक्रीचे पीओएस असतात. हे पेटीएम किंवा अन्य कंपन्यांचे असू शकतात. माय फास्टॅग अॅप डाऊनलोड करून माहिती भरल्यानंतर फास्टॅग अॅक्टिव्हेट करता येतो.13 / 15फास्टॅग हा कारच्या नंबरवर असतो. हा नंबरही युनिक असतो. यामुळे टोल नाक्यांवरून जात असताना पुढील स्क्रीनवर तुमच्या वाहनाचा नंबर दिसतो.14 / 15वाहन विकल्यास फास्टॅग नवीन मालकाला वापरता येत नाही. जरी तुम्ही तो फास्टॅग कारवरच ठेवला तर तुमच्याच अकाऊंटमधून पैसे कापले जातात. यामुळे वाहन विकताना फास्टॅग काढलेला योग्य. फास्टॅग हस्तांतरणीय नाही.15 / 15FASTag कधीही एक्स्पायर होत नाही. यामुळे यावर टाकलेला बॅलन्सदेखील एक्स्पायर होत नाही. तुमची कार बरेच दिवस टोल नाक्यावर गेली नाही तरीही त्याचा काहीही फरक फास्टॅग सस्पेंडवर होत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications