शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Budget 2022: बजेटपेक्षाही चर्चा अर्थमंत्र्यांच्या साडीची! सीतारामन यांच्या खास साडीनं वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या किंमत आणि महत्व...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 7:14 PM

1 / 8
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चौथ्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. खरंतर दरवर्षी बजेटसोबतच अर्थमंत्र्यांच्या साडीची देखील चर्चेचा विषय ठरते. निर्मला सीतारामन दरवर्षी हातमागाला प्रोत्साहन देण्यासाठी हॅण्डलूम साडी परिधान करणं पसंत करतात.
2 / 8
निर्मला सीतारामन यांनी आजही हण्डलूम साडी परिधान केली होती. यंदा मात्र त्यांनी गडद रंगाला प्राधान्य दिलं. तसंच त्यांच्या साडीवरील आकर्षक नक्षीकामनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
3 / 8
निर्मला सीतारामन यांनी आज चॉकलेटी रंगाची साडी आणि त्यावर गडद मरुन रंगाचा ब्लाऊज परिधान केला होता. तसंच साडीवर पांढऱ्या रंगाची आकर्षक प्रिंट देखील होती.
4 / 8
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी परिधान केलेल्या साडीला पांढऱ्या रंगाची बॉर्डर होती. त्यावर बारीक रेषा आणि कलाकुसर केली गेली होती. तर एक साधी सोन्याची चैन, हातात बांगडी आणि छोटेसे इअररिंग्ज घातले होते. त्या नेहमी सिम्पल आणि डिसेंट लूकला पसंती देतात.
5 / 8
निर्मला सीतारामन बजेट सादर करताना परिधान करत असलेल्या साड्यांची दरवर्षी चर्चा होते. कारण त्या साड्या खूप खास असतात. २०१९ पासून आतापर्यंत निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या दिवशी नेसलेल्या साड्यांना एक विशेष महत्त्व आहे. २०२१ साली त्यांनी क्रिप्स लाल रंगाची साडी नेसली होती. त्यावरही पांढऱ्या रंगाचं नक्षीकाम केलं होतं. पोचमपल्ली हण्डलूमसाडीला त्यांनी प्राधान्य दिलं होतं.
6 / 8
२०२० साली सीतारामन यांनी नेसलेल्या साडीची खूप चर्चा झाली होती. सीतारामन यांनी पिवळ्या रंगाची कांजीवरम साडी त्यावेळी नेसली होती. उठावदार पिवळा रंग आणि सोनेरी किनार असलेल्या साडीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
7 / 8
२०१९ साली आपल्या पहिल्याच बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी गडद गुलाबी रंगाच्या साडीला प्राधान्य दिलं होतं. या साडीला देखील सोनेरी रंगाची किनार होती.
8 / 8
निर्मला सीतारमण यांना आंध्र प्रदेशची पोचमपल्ली साडी फार आवडते. तसेच, त्यांच्याकडे जामदानी साड्याही आहेत. या साड्या पश्चिम बंगालमध्ये तयार होतात. कामाकाजावेळी निर्मला सीतारमण या कोटा डोरियाच्या सिल्क साड्या परिधान करतात. सीतारमण ज्या प्रकारच्या साड्या वापरतात या साड्या एक हजार रुपयांपासून ते १२ हजार रुपयांमध्ये मिळतात. तर प्युअर हॅण्डलूम साड्यांची किंमत चार हजार रुपयांपासून सुरु होते.
टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBudgetअर्थसंकल्प 2022